पुणे : कोरोना थैमानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र 3 मे नंतर कोरोनाचा फारसा प्रभाव नसलेल्या भागात लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. मात्र पुणे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. मात्र शहरातील जो भाग कोरोना संसर्गापासून दूर आहे, अशा भागात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहरातील काही भागात लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा विचार सुरू आहे. मिनी क्लस्टर करून शहरात बाधित नसलेल्या भागातले व्यवहार सुरू करण्याचा विचार करण्यात ये आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. तसंच उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत लॉकडाऊन शिथील करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड चे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोयी, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


अधिक वाचा  वाचाळवीरांवर आयुक्तांनी व्यक्तिशः लक्ष देऊन कारवाई करावी - धुमाळ.