कळंब : दाभा गावचे सुपुत्र तथा न्युजमेकर.लाईव्ह चे संपादक महेश दत्तात्रय टेळेपाटील आणि युवा नेते दादासाहेब दिगंबर टेळे यांच्या विशेष प्रयत्नाने नई दिल्ली याठिकाणच्या गुंज या सामाजिक तथा सेवाभावी संस्था च्या वतीने दाभा गावांमध्ये गरजू कुटुंबांना राशन आणि किराणाचे वाटप करण्यात आले.यावेळी रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष सचिन टेळे, अतुल टेळे, सचिन बाबुराव टेळे, बालाजी टेळे, मुरली (बप्पा) टेळे आदी उपस्थित होते.

गुंज या संस्थेचे अजित कांकरिया साहेब(मुरुड), सामाजिक कार्यकर्ते प्रदीप वाघमारे,ओव्हाळ सर (हिंगणगाव),सतिश जाधव यांच्या विशेष सहकार्यमुळे दाभा गावातील गरजू कुटुंबाना सहकार्य करता आले. आणखी काही गरजू कुटुंबातील व्यक्तींना मदत केली जाईल असे आश्वासन “गुंज” या सामाजिक संस्था च्या वतीने उपस्थित सामाजिक कार्यकर्ते यांनी यावेळी दिले. त्याबद्दल गुंज संस्थेचे सर्व पदाधिकारी सभासद यांचे दाभा ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार आणि धन्यवाद मानण्यात आले.

अधिक वाचा  …पण ठाकरे कुणाचेच नाहीत; गुलाबराव पाटील यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका