सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतुन आम्ही वारजेकर मित्र परिवाराचे वतीने आज वारजे माळवाडी परिसरातील ३५० कुटुंबाना कोरडा शिधा कीट चे घरपोच वाटप करण्यात आले . यामध्ये ५ किलो गहू , ५ किलो तांदुळ , १ किलो तूरडाळ , २ किलो तेल , २ किलो साखर , अर्धा किलो चहापावडर , १ किलो मीठ , हळद , मिरची पावडर , जिरे , मोहरी प्रत्येकी १०० ग्रॅम , खोबरेल तेल , अंगाचा साबण १ , कपड्याचा साबण २ , टुथपेस्ट १०० ग्रॅम इत्यादी वस्तुंचा सामावेश होता . वारजे माळवाडी परिसरातील खरच ज्यांचे हातावर पोट आहे ,ज्यांना गरज आहे अश्या गरजूंची खात्री करून या कीटचे वाटप करण्यात आले .
वारजे माळवाडीतील रामनगर , गोकुळनगर , अमरभारत सोसायटी , यशोदिप चौक परिसर, म्हाडा काॅलनी , सहयोगनगर , गोकुळनगर पठार , भोपळे चौक , राजयोग सोसायटी , वारजे हायवे चौक , दत्तनगर , विठ्ठलनगर , रेणुकानगर , गणेशपुरी , दिगंबरवाडी , अहिरे गाव येथील कष्टकरी , मोलमजुरी करणारे , मध्यमवर्गीय गरजु कुटुंबांना आजपर्यंत किमान ३५० कुटुंबाना या शिधा किटचे १ महिना पुरेल , १५,दिवस पुरेल , काहींना ३ किलो गहू , २ किलो तांदुळ अश्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे . श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या माध्यमातुन १२५० जेवणाचे पॅकेट वाटण्यात आले . एका स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दररोज किमान १०० फुड पॅकेटचे गरजुंना वाटप करण्यात येत आहे .
यात कामगार, घरकाम, टेलरिंगकाम , मोलमजुरी , सुतारकाम , पेटींगकाम , गवंडी , ड्रायव्हर ,कपडे विकणे , पेट्रोल पंप कर्मचारी , वाॅचमन अशी कामे करणारे कुटुंबांचा सामावेश होता .यासाठी मदत करणारे ज्ञात अज्ञात हातांचे मनस्वी आभार मानावे तितके कमीच आहेत .या वाटपासाठी सचिन दशरथ दांगट, भाऊसाहेब जंजिरे , दिपक बिडकर , गुरूवर्य दिपकमामा भोसले, आदित्य बीडकर, राजेंद्र वाघ , ऋषिकेश रजावात , कृष्णा गिरमे , आनंद देशपांडे , अमजद अन्सारी , चेतन मेस्त्री , वर्षा पवार , रेणुका मोरे यांनी परिश्रम घेतले आहेत.