मुंबई : कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी अनेक कोरोना हिरो दिवसरात्र आपल्या घरापासून लांब राहून देशाची सेवा करत आहेत. अशा महामारीच्या परिस्थितीत अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. तर आता अनेक दिग्गज कलाकारांना व्हॅनिटी व्हॅन देणाऱ्या केतन रावलने आपल्या व्हॅनिटी व्हॅन पोलीस कर्मचाऱ्यांना वापरण्यासाठी दिल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात पोसील २४ तास आपल्या कर्तव्याचे पालन करत आहेत. अशात त्यांची गैरसोय होवू नये म्हणून केतनने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

कर्तव्य बजावत असताना पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत. विशेष करून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अन्य त्रास देखील सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही व्हॅनिटी व्हॅन त्यांच्यासाठी प्रचंड लाभदायक ठरत आहे. केतन शिल्पा शेट्टी, सैफ अली खान, कंगना रानौत, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू यांना भाड्याने व्हॅनिटी व्हॅन देत असतो.

अधिक वाचा  भारत तीनही फॉरमॅटमध्ये १ नंबर! कांगारूवर मात या देशांची अव्वल स्थानाची रस्सीखेच सुरूच

केतन यांच्या सांगण्यानुसार मुंबईत तब्बल ३०० व्हॅनिटी व्हॅन आहेत. त्यापैकी अभिनेता शाहरूख खान, अनिल कपूर,रितेश देशमुख, अजय देवगन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणकडे स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन आहे. तर आता हे सेलिब्रिटी कोरोना हिरोंना वापरण्यासाठी त्यांची व्हॅन देतील का? अशा चर्चा रंगत आहेत. शिवाय पोलिसांना वापरण्यासाठी देण्यात आलेल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये टॉयलेट, चेंजिंग रूम आणि इतर सुविधा देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत.