मुंबई : टाटा ट्रस्टने वैयक्तिक सुरक्षा सामग्रीच्या (पीपीई) १ कोटी किटच्या आयातीचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ओव्हरऑल कोट, मास्क, ग्लोव्ह्ज व गॉगल्स यांचा समावेश आहे. याखेरीज एन-९५, केएन-९५ मास्क तसेच शस्त्रक्रियेसाठीच्या मास्कचाही समावेश आहे.
अशा १ कोटी किट जगाच्या विविध भागांतून मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. टप्प्याटप्प्याने ही आयात होईल. त्यानंतर ही सामग्री देशाच्या विविध भागांत पाठवली जाणार आहे.
‘करोनाचा सामना करण्यासाठी तातडीच्या आपत्कालीन सामग्रींची गरज आहे. ही सामग्री उपलब्ध करणे हे सद्यस्थितीत सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे’, असे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी व्यक्त केले आहे.

अधिक वाचा  पुणे विधानसभा जागावाटप ‘ठिणगी’? महायुतीत 0 जागा तरी माविआत ‘त्या’ 5 जागा ठाकरेंच्या सेनेला हव्यात!