मुंबई : राज्य सरकारने संचारबंदीच्या काळात मंत्रालय, महापालिका व अत्यावश्यक सेवेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 एप्रिलपासून संचारबंदीत शिथिल करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून राज्य परिवहन मंडळाच्या 50 विशेष बस सोडण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी एक परिपत्रक काढलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन आहे. 21 एप्रिलपासून संचारबंदी शिथिल करण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कर्मचारी व इतर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मुंबई, ठाणे आणि पालघरपासून मंत्रालयापर्यंत विशेष एसटी सेवा देण्यात येणार आहे. अतिरिक्त औद्योगिक घटकांसह, शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्रात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक सूट देण्यात येणार आहे. मात्र, 10 टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे.
मंत्रालय, आणि इतर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीची विशेष सेवा देण्यात येणार आहे. पालघर, ठाणे, पनवेल डेपोच्या मंत्रालयपर्यंत विशेष सेवा देण्यात येणार आहे. दररोज सकाळी 8.30 ते 5.50 या वेळेत एसटी बस 50 फेऱ्या करेल. पालघर, बदलापूर, आसनगाव, शहापूर, वसई, नालासोपारा मिरारोड अशा अनेक उपनागरातून या एसटी धावणार आहे.
संचारबंदीच्या काळात कर्मचाऱ्यांची समस्या दूर करण्यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात उपाय योजना राबवताना तयार करण्यात आलेल्या सूचना व नियमांच काटेकोर पालन कर्मचाऱ्यांना करावं लागणार असल्याचे राज्य सचिवालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

अधिक वाचा  काँग्रेस नेते आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला, भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण