हडपसर (पुणे) : कोरोना सारख्या महाभयानक संकटाला संपूर्ण देश सामोरे जात आहे. लॉक डाऊनच्या परस्थितिमध्ये हातावर पोट असणाऱ्या लोकांना जीवन आवश्यक वास्तुची मोठ्या प्रमाणात भासणारी गरज ओळखून हडपसर भागातील, हांडेवाडी रोड, महंमदवाडी रोड, सय्यद नगर, चिंतामणी नगर आदी भागातील लोकांना अन्नधान्याची एक महीना पुरेल इतके रेशन किट देऊन स्माईल फाउंडेशन च्या वतीने मदत केली.

स्माईल फाउंडेशन च्या माध्यमातून सांगली, भिलवाड़ी येथे अन्यधन्य व संसार उपयोगी साहित्य यांची मदत केली. भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त “भारतीय नैसर्गिक चित्र व भारतीय समाज” या विषयावर चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 100 स्पर्धकानी सहभाग घेतला. यावेळी सहभागी स्पर्धक आणि विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

अधिक वाचा  संघाच्या हिंदुत्ववादी भूमिकेलाच आव्हान व्यापारी जोडीचा डाव: भाजपचे वस्त्रहरणही याच दुर्योधनांनी केले: शिवसेना

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनला प्रतिसाद देत श्रेष्ठदान रक्तदान या शिबिराचे आयोजन फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आले यावेळी सर्व पदाधिकारी आणि सभासदानी सहभाग घेऊन रक्तदान केले. स्माईल फाउंडेशनचे मार्गदर्शक समद चाचा शेख, रमजान शेख यांची मदत व सहकार्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मतीन शेख(अध्यक्ष), तौफीक शेख, जब्बार शेख, मजीद सय्यद, अलीम बागवान, हैदर कुसगल, रहीम शेख, इनुस शेख, वसीम शेख आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.