मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे प्रत्येकाळी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संकटामुळे लागू असलेल्या लॉकडाऊन-२ च्या पार्श्वभूमीवर, पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या रमजान महिन्यासाठी, मुस्लिम विचारवंतांनी आणि मशिदींमधल्या इमामांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रमजानच्या काळात मशीदीत न जाण्याचे आवाहन इमामांनी केले आहे.
२४ एप्रिलपासून सुरु होत असलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुक्तार नक्वी यांनी देशातील राज्य वक्फ बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडीयोकॉन्फ़्रेंसिंग द्वारे चर्चा केली. त्यावेळी हे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लॉकडाऊन,सोशल डिस्टेंन्सिंगचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले.
रमजान काळात मशिदींमध्ये जाऊ नये, घरीच नमाज अदा , कुराण पठण आणि इफ्तार हे मुस्लिम बांधवांनी घरातच करावे, इफ्तार मेजवानीचे आयोजन करु नये, गरिबांना अन्न , तसेच आर्थिक मदत करावी , सरकारच्या लॉकडाऊन-२च्या सूचनांचे तंतोतंत पालन करुनच रमजानच्या काळात खरेदी करावी आदी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुस्लिम समाजाने या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.