मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI PC India GDP growth rate) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, कोरोनाविरुद्धच्या लढ्याबाबत (RBI PC India GDP growth rate) माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने पुन्हा रेपो दरात कपात केली. त्यामुळे रेपो दर 4 टक्क्यांवरुन 3.75 टक्क्यांवर आला. त्यामुळे सर्वप्रकारच्या कर्जांवरील व्याजदर कमी होईल. याशिवाय बाजारात चलन तुटवडा जाणवू नये, यासाठी 50 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त मदतीची घोषणा दास यांनी केली.

“कोरोनामुळे जगावर मंदीचं सावट आहे. मात्र भारताची आर्थिक स्थिती अन्य देशांच्या तुलनेत बरी आहे. कोरोनासंकटामुळे भारताचा GDP 1.9 टक्के राहील जो G20 देशांमध्ये सर्वाधिक असेल”, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. इतकंच नाही तर कोरोनामुळे जगभरात 9 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच अंदाजे 70 हजार कोटी रुपयांचं नुकसान होईल, अशी भीती दास यांनी व्यक्त केली.
शक्तिकांत दास म्हणाले, “कोरोनाशी लढण्यासाठी शक्य ती सर्व उपाययोजना केली जात आहे. 150 पेक्षा अधिकारी क्वारंटाईन असूनही काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF ने अंदाज वर्तवला आहे की जगभरात मंदी येईल. त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे. अनेक देशात आयात-निर्यात घटली आहे.

अधिक वाचा  समंथा-नागाचैतन्यच्या घटस्फोटावरून तेलंगणात राजकारण तापलं, थेट मंत्र्यावर 100 कोटींचा खटला !

कोरोना संकटामुळे भारताचा GDP विकासदर 1.9 राहील. मात्र हा G20 देशात सर्वाधिक असेल. जगभारत 9 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त नुकसानाचा अंदाज आहे. मात्र कोरोनाचं संकट टळेल तेव्हा भारताचा GDP विकासदर पुन्हा 7 टक्क्याच्या वेगाने वाढेल”