करोना विषाणूच्या संक्रमणामुळे आपल्या आयुष्यावर कमालीचा परिणाम झाला आहे. लॉकडाउनमुळे ज्या ग्राहकांचा रोख रकमेचा ओघ आटला आहे, त्या ग्राहकांना मदत करण्यासाठी अनेक बँका मॉरेटोरिअम (ईएमआय स्थगित करून पुढे ढकलणे) ही सुविधा देत आहेत. परंतु, हप्ता पुढे ढकलल्यास त्यावर व्याज भरावे लागणार असल्याने, ज्या ग्राहकांना कोविड १९ साथीमुळे आर्थिक फटका बसलेला नाही त्या ग्राहकांनी ईएमआय नियमितपणे भरावा. असंख्य संख्येने ग्राहक आपापल्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग साइटचा वापर करून ईएमआय स्थगित करण्याचा पर्याय स्वीकारत असल्याने, या ग्राहकांना लुटण्यासाठी नव्या प्रकारचे घोटाळे करण्याची संधी शोधणारे घोटाळेखोर सातत्याने प्रयत्न करत आहेत. काही केसेसमध्ये, घोटाळेखोर ग्राहकांना कॉल करत आहेत, त्यांचे ईएमआय पुढे ढकलण्यासाठी बँकांनी जाहीर केलेल्या मॉरेटोरिअमचा फायदा घेणयासाठी त्यांना ओटीपी विचारत आहेत. एकदा ग्राहकाने ओटीपी दिला की घोटाळेखोर ग्राहकांच्या खात्यातून तातडीने पैसे काढून घेतात. अशा घोटाळेखोरांबद्दल जागृती करण्यासाठी आणि ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी, आयसीआयसीआय बँकेने सुरक्षितपणे बँकिंग कसे करावे, याचे मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये, मोबाइल बँकिंग करत असताना, ग्राहकांनी कोणत्या सुरक्षेच्या टिप्स विचारात घ्याव्यात, याचा समावेश करण्यात आला आहे.
१) ईएमआय मॉरेटोरिअमचा लाभ घेण्यासाठी ओटीपी शेअर करू नका: ईएमआय किंवा व्याजदर भरणे पुढे ढकलण्यासाठी (मॉरेटोरिअम) तुमचा ओटीपी किंवा पासवर्ड मागण्यासाठी तुमची बँक कधीही तुम्हाला कॉल करणार नाही किंवा ईमेल पाठवणार नाही. ओटीपी, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही नंबर, नेटबँकिंग किंवा मोबाइल बँकिंग पासवर्ड, कस्टमर आयडी, यूपीआय पिन असा कोणताही गोपनीय किंवा खासगी तपशील बँक कर्मचाऱ्यासह कोणालाही देऊ नका.
२) मोबाइल बँकिंग अॅपवरील ‘ऑटो सेव्ह’ किंवा ‘ऑटो कम्प्लिट’ ही वैशिष्ट्ये बंद करून ठेवा: मोबाइल बँकिंग व इंटरनेट बँकिंग व्यवहार करत असताना, ऑटो फिल किंवा सेव्ह युजर आयडी किंवा पासवर्ड सुरू करू नका. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी सोयीचे असले तरी ते धोकादायक ठरू शकते.
३) फिशिंग टेक्स्टला प्रतिसाद देऊ नका : अनभिज्ञ ठिकाणाहून आलेल्या URL चा वापर करू नका किंवा वैयक्तिक माहिती किंवा ऑनलाइन बँकिंग तपशील ईमेलद्वारे किंवा टेकस्ट मेसेजद्वारे कोणालाही देऊ नका. हा तुमची ओळख चोरणाऱ्या प्रयत्न असू शकतो.
४) व्हेरिफिकेशन कॉलपासून सावध राहा : कॉलर सहसा बँकेचा प्रतिनिधी किंवा बँकेच्या तांत्रिक टीममधील असल्याचे भासवतो. सुरक्षेची खोटी खात्री दिल्यानंतर, कॉलर ग्राहकांना त्यांचा वैयक्तिक तपशील व गोपनीय माहिती देण्यासाठी भाग पाडतात. याबद्दल जेव्हा संशय येईल तेव्हा बँकेला किंवा तुमच्या बँकेशी संबंधित वित्तीय सेवा संस्थेला कॉल किंवा ईमेल करा आणि या कॉलविषयी सांगा.
५) खाते वेळोवेळी तपासा : तुमच्या आर्थिक आरोग्याविषयी जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. तुमच्या आर्थिक बाबींचा मागोवा घेण्यासाठी तुमची बँक खाती नियमित तपासा. प्रत्येक वेळी व्यवहार करत असताना, खात्यातील बॅलन्स पुन्हा तपासा आणि योग्य रक्कम भरल्याची किंवा स्वीकारल्याची खात्री करा. कोणतीही विसंगती आढळली तर तातडीने तुमच्या बँकेशी संपर्क साधा.
६) नोटिफिकेशन देणारा पर्याय सुरू ठेवा : तुमच्या बँकेकडून मिळणारे ईमेल व एसएमएस नोटिफिकेशन सुरू ठेवावे. यामुळे, तुमच्या खात्यातून होणाऱ्या व्यवहारांविषयी तुम्हाला माहिती मिळेल. संशयास्पद व्यवहार होत असल्याचे ओळखण्यास मदत होईल व तसे बँकेला वेळेत कळवता येईल.
७) यूपीआय व्यवहार करत असताना सुरक्षेचे उपाय : सुरक्षित व सुलभ पद्धतीने बँकिंग करणे शक्य होण्यासाठी एनपीसीआयने यूपीआय पेमेंट व्यवस्था दाखल केली आहे. बँकिंगची अनेक वैशिष्ट्ये, फंड रुटिंग, कलेक्शन रिक्वेस्ट व पेमेंट रिक्वेस्ट सुरळितपणे करता येऊ शकते. व्यवहार करत असताना, केवळ पेमेंट करत असताना पिनची गरज लागते, पेमेंट स्वीकारत असताना लागत नाही, हे ग्राहकांनी लक्षात ठेवावे. ग्राहकांनी स्क्रीन-शेअरिंग अॅपवर मर्यादा घालाव्यात आणि पिन, कार्ड व ओटीपी यांचा तपशील कधीही कोणालाही देऊ नये. ग्राहकांनी केवळ विश्वासार्ह अॅप डाउनलोड करावेत आणि एटीएम पिनप्रमाणे एम-पिन सांभाळावा व कोणालाही सांगू नये.
अधिक खबरदारी घेण्यासाठी, पेमेंट अॅपवर लॉकची सोय करावी. स्क्रीनवरील टेक्स्ट काळजीपूर्वक वाचा आण एखाद्याने यूपीआय अॅपवर अनावश्यक मनी रिक्वेस्ट पाठवली आहे का हे तपासा. घोटाळ्याचा कोणताही संशय आल्यास व्यवहार नाकारा. अखेरीस, तुमच्या स्मार्टफोनवर परिणामकारक मोबाइल अँटि-मालवेअर किंवा अँटि-व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि ते सतत अपडेट करा. सुरक्षित राहा! सुरक्षित बँकिंग करा!
dailyhunt
दुर्दैवी! पोट भरण्यासाठी मजुरांवर स्मशानाबाहेर कचऱ्यात फेकलेली केळी खाण्याची वेळ
लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त हाल मजुरांचे होत आहेत. देशाची राजधानी दिल्लीतही भीषण परिस्थिती आहे. दिल्लीमधील काश्मीरी गेटजवळ हजारो प्रवासी मजुरांवर यमुनेच्या किनारी झोपण्याची वेळ आली आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, या मजुरांना सडलेली केळी खावी लागत आहेत. दिल्लीमधील निगमबोध घाटाजवळ यमुनेच्या किनारी सडलेल्या केळींचा ढीग पडला असून प्रवासी मजूर यामधून चांगली केळी शोधत पोटाची आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. निगमबोध घाटाजवळच शहरातील मुख्य स्मशानभूमी आहे.
एका मजुराने सांगितलं आहे की, “काय करणार…खाण्यासाठी काही मिळत नसल्याने केळी खात आहोत. मी मूळचा अलीगडचा असून येथेच झोपत आहे. जेवायला काही नाही त्यामुळे हे केळ चालेल”. तर दुसऱ्या एका मजुराने म्हटलं आहे की, “केळ लवकर खराब होत नाही. जर आम्ही चांगलं केळ उचललं तर जास्त वेळ ते लवकर खराब होणार नाही”.
५५ वर्षीय जगदीश कुमार मूळचे बरेलीचे असून जुन्या दिल्लीत मजूरी करतात. लॉकडाउनमुळे सगळं बंद पडलं असून त्यांच्याकडे राहण्यासाठीही जागा नाही. रस्त्यावर झोपलं तर पोलीस मारतात यामुळे ते यमुनेच्या किनारीच येऊन राहत आहेत. जगदीश यांनी सांगितलं आहे की, “दोन दिवसांपासून खायला अन्न मिळालेलं नाही. इथेच मजुरी करायचो आणि आता अडकलो आहे”.
यमुना किनारी जगदीश यांच्याप्रमाणे हजारो मजुरांवर ही परिस्थिती ओढावलेली आहे. लॉकडाउनचे दिवस कधी संपणार याची वाट ते पाहत आहेत. प्रसारमाध्यमांची दखल घेत दिल्ली सरकारने अखेर या मजुरांना शाळांमध्ये शिफ्ट करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. दिल्ली सरकारच्या वतीने विपीन रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, “येथे हजारो मजूर आहेत. त्यांना आम्ही शाळांमध्ये नेत आहोत जिथे शेल्टर होम तयार करण्यात आले आहेत”.
dailyhunt
जगभरात करोनामुळे एक लाख २७ हजार ६३५ जणांचा मृत्यू
जगभरात करोनाची २० लाख १५ हजार ५७१ जणांना लागण झाली असून आतापर्यंत एक लाख २७ हजार ६३५ जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ युरोपमध्ये १० लाख तीन हजार २८४ जणांना लागण झाली असून ८४ हजार ४६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
स्पेनमध्ये एक लाख ७२ हजार ५४१ जणांना करोनाची लागण झाली असून १८ हजार ०५६ जणांचा मृत्यू झाला आहे तर इटलीमध्ये एक लाख ६२ हजार ४८८ जणांना लागण झाली असून २१ हजार ०६७ जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये एक लाख ४३ हजार ३०३ जणांना लागण झाली असून १५ हजार ७२९ जणांचा मृत्यू झाला आहे तर जर्मनीमध्ये तीन हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये ९३ हजार ८७३ जणांना लागण झाली असून १२ हजार १०७ जणांचा मृत्यू झाला आहे.
dailyhunt
अमेरिकेकडून ‘डब्ल्यूएचओ’चा निधी बंद
आधीच इशारा दिल्यानुसार अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेची आर्थिक मदत बंद केली आहे. दरवर्षी अमेरिका आरोग्य संघटनेला ५० कोटी डॉलर्सची मदत देत असते, पण यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची साथ गलथानपणे हाताळतानाच चीनकेंद्री भूमिका घेतल्याचा ठपका ठेवून ही मदत बंद करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन जाहीर केला आहे.
करोनाची साथ पसरवण्याच्या व त्यातील माहिती दडवण्याच्या चीनच्या कृत्यांवर जागतिक आरोग्य संघटनेने पांघरूण घातले असा आरोप अमेरिकेने केला आहे. आतापर्यंत कोविड-१९ साथीत जगात १,१९,००० बळी गेले असून अमेरिकेत पंचवीस हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने तीव्र चिंता व्यक्त केली असून जागतिक आरोग्य संघटनेला चीनकडून दिलेल्या मदतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, चीनने करोनाविरोधात लढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला आधीच २ कोटी डॉलर्स दिले आहेत.
ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाइट हाऊसच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेची मदत बंद करण्याचा आदेश आपण प्रशासनास दिला असून जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ म्हणजे करोनाची साथ कशी हाताळली याचा आढावा घेतला असता त्यात त्यांचा गलथानपणा उघड झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने चीनला कसे पाठीशी घातले हे आता सर्वानाच माहिती आहे. चीनमधून प्रसारित झालेल्या करोना विषाणूमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईस आली, असा आरोप ट्रम्प व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेची मदत बंद करण्यास अत्यंत चुकीची वेळ निवडण्यात आली आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकी करदात्यांच्या पैशातील ४० ते ५० कोटी डॉलर्स हे जागतिक आरोग्य संघटनेला मदतीपोटी दिले जात होते पण चीन मात्र वर्षांला ४ कोटी किंवा त्याहून कमी डॉलर्स आरोग्य संघटनेला देत होता. जागतिक आरोग्य संघटनेने अमेरिकेला हवाई वाहतूक निर्बंध लादण्यापासून परावृत्त केले त्यामुळे विषाणू अमेरिकेत पसरला, पण नंतर आम्ही परदेशातून येणारी विमाने बंद केली. त्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचण्यास मदत झाली. अमेरिकेत कोविड १९ विषाणूचा प्रसार व त्यानंतर तेथील अर्थव्यवस्था कोसळण्यास जागतिक आरोग्य संघटना जबाबदार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची साथ हा सार्वजनिक आरोग्यास मोठा धोका आहे हे जाहीर करण्यास विलंब केला.
चीनमध्ये करोनावर वैज्ञानिक, संशोधन करणारे लोक व डॉक्टर्स यांना गायब करण्याचे चीनचे पाप जागतिक आरोग्य संघटनेने पाठीशी घातले. अमेरिकी तज्ञांना चीनमध्ये संशोधनासाठी जाण्यापासून आडकाठी केली.
आरोग्य संघटना चीनच्या माहितीवर विसंबून राहिल्याने जगात करोनाची साथ वीस पटींनी अधिक फैलावली असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे

अधिक वाचा  अजित पवारांनी सांगितलं उमेदवारी मागे घ्या, तर?, वाचा नवाब मलिकांच उत्तर