सांगली : संपूर्ण देशात कोरोनाच्या फैलावामुळे लॉकडाऊन आहे. तसेच राज्यात संचारबंदी लागू आहे. असे असताना उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून चक्क ३० प्रवाशांना घेऊन एक बस सांगलीत दाखल झाली. धक्कादायक बाब म्हणजे या बसमधील काही प्रवासी सांगोला येथे उतरल्याची बाब पुढे आली आहे. लॉकडाऊनच्या काळात यांना प्रवासाची कोणी मुभा दिली. त्यांची वैद्यकीय चाचणी केली होती का, आदी सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
सांगली जिल्ह्यातील काही प्रवाशांना घेवून वाराणसीहून एक बस सांगली जिल्ह्यात आली. याची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत यातील ३० प्रवाशांना शासकीय तंत्रनिकेतन येथील इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये दाखल केले. या सर्व प्रवाशांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविले. तसेच सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
वाराणसीहून बसमधून आलेले हे प्रवासी मिरजेत इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये असले तरी या बसमधील आठ प्रवासी सोलापूर जिल्ह्यतील सांगोला येथे उतरले आहेत. सर्वात धक्कादायकबाब म्हणजे संचारबंदी आणि लॉकटाऊन असताना सुद्धा वाराणसी प्रशासनाने प्रवाशाना परवानगी दिलीच कशी, प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

अधिक वाचा  राज्यसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, ‘त्या’ उमेदवाराचा अर्ज बाद, नेमकं काय कारण?