वॉशिंग्टनः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत म्हणजे आणखी २१ दिवसांनी वाढवलाय. याचा विपरीत परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) जगाचा आणि भारताचा या वर्षीचा आर्थिक विकास दराचा अंदाज वर्तवला आहे. जागतिक अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर उणे ३ टक्क्यांपर्यंत खाली येईल. तर भारताचा विकास दर १.९ टक्के इतका असेल, असं नाणेनिधीने म्हटलंय. म्हणजे २०२०मध्ये देशाची अर्थव्यवस्था तळ गाठेल, असा अंदाज नाणेनिधीनं व्यक्त केलाय. पण यासोबतच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक चांगली बातमीही दिली आहे. पुढच्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था मोठी उसळी घेईल, असं म्हटलंय.
करोना व्हायरसमुळे जगाची अर्थव्यवस्थाच ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकालाही करोनाचा फटका बसला आहे. युरोपमधील जर्मनी, फ्रान्सआणि ब्रिटनसारख्या आघाडीच्या देशांच्या अर्थव्यवस्थांनाही झटका बसला आहे. विकसित देशांची ही परिस्थिती असताना भारतासारख्या विकसनशिल देशांची अवस्था अधिकच बिकट बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांना २१ दिवसांचा लॉकडाऊ घोषित केलाय. ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने अर्थव्यवस्थेला झटका बसला आहे. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून लाखो लोक बेरोजगार होतील आणि दरडोई उत्पन्नावर परिणाम होईल असं म्हटलंय.
२०२० मध्ये भारताचा आर्थिक विकास दर हा १.९ टक्के इतका असेल. यासोबतच जागतिक अर्थव्यवस्था ही उणे तीन टक्क्यांपर्यंत घसरेल. २००८-०९ मधील मंदीपेक्षाही बिकट स्थिती या वर्षी असेल, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलंय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागितक अर्थव्यवस्था विकास दरवाढीचा आलेख जाहीर केला. करोना व्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला किती मोठा झटका बसणार आहे, हे या आलेखातून दाखवण्यात आलं आहे.
करोना व्हायरसमुळे जगात मोठी जीवितहानी होत आहे. अनेक बळी जात आहेत. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन घोषित करून आपल्या नागरिकांचे जीव वाचवण्यावर भर दिला आहे. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. यामुळे २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था उणे ३ टक्क्यांवर येणार आहे. तर २०१९ मध्ये भारताचा विकास दर हा ४.२ टक्के इतका होता. या वर्षी या घसरण होऊ हा विकास दर १.९ टक्के इतका असेल. पण २०२१मध्ये भारतीय अर्थव्यवस्थाही उसळी घेईल. २०२१मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के इतक्या वेगवान विकास दराने धावेल, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आणि संशोधन विभागाच्या प्रमुख गीता गोपीनाथ यांनी सांगितलं.

अधिक वाचा  ‘महिला आरक्षण अंमलबजावणी 2039 उजाडेल’ विधेयकातचं ही अट यामुळे नाराजी पसरणार?