मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे चित्र रेखाटून अभिवादन केले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी आज सर्जनशील पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केले. बाबासाहेबांचे एक चित्र रेखाटत आणि विचार शेअर करत त्यांनी भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमित ठाकरे यांना आजोबा बाळासाहेब ठाकरे आणि वडील राज ठाकरे यांच्याकडून रेखाचित्रांच्या कलेचा वारसा मिळाला आहे. अत्यंत कुशल पद्धतीने त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र रेखाटले आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांनी ते प्रसिद्धही केले. विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या चित्रासह त्यांचे ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हे विचारही अमित ठाकरे यांनी शेअर केले आहेत. तसेच या क्रांतीसूर्याला विनम्र अभिवादनही केले आहे.
राजकारणात सक्रीय झाल्यापासून अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे महापुरुषांना अभिवादन करणारी पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट शेकडो युजर्सनी शेअर केली असून त्यावर हजारो लाईक्स आणि काही कमेंट्सही आल्या आहेत.

अधिक वाचा  मॅग्मा एचडीआयचा – “वनप्रोटेक्ट” आधुनिक वैयक्तिक अपघात विमा