नाशिक : मालेगाव शहरामुळे नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडलाय. आजच्या घडीला एकट्या मालेगावात कोरोनाचे तब्बल ३० रुग्ण आहेत. मालेगावकरांना लॉकडाऊन, संचारबंदी मंजूर नाही अशी स्थिती आहे. यामुळं एका दिवसात मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे.
मालेगावकरांमुळे एका दिवसात नाशिक जिल्हा कोरोनाच्या ग्रीन झोनमधून रेड झोनमध्ये गेला. मालेगावात कोरोना वेगानं पसरला. याला दुसरं तीसरं कोणीही जबाबदार नसून खुद्द मालेगावकरच कोरोनाच्या प्रसाराला जबाबदार आहेत. देशात लॉकडाऊन आणि राज्यात संचारबंदी असतानाही मालेगावमधे मात्र सर्व जनजीवन सुरळीत होतं. बाजारपेठेत गर्दी होती. धार्मिक स्थळी सामूहिक प्रार्थना सुरु होती. कोरोना ही प्रेशिताचीच देणगी असल्याचा संदेश कुणीतरी मालेगावकरांमध्ये पसरवला आहे.

अधिक वाचा  उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची एकनाथ शिंदेंच्या मनाची तयारी आहे का? शिवसेना प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य