नई दिल्ली : १४ एप्रिलनंतर दोन आठवडे लॉकडाऊन राहणार हे निश्चित आहे. मात्र, संसर्गाची स्थिती, भावी धोके, नवे रुग्ण याच्या आधारे लॉकडाऊनमध्ये सूट देण्याचा विचार सुरू आहे. सरकार देशात राज्यांऐवजी संसर्गाचा विचार करून रेड, ऑरेंज, येलो आणि ग्रीन असे विभाग करण्याच्या तयारीत आहे.
हे बंद : सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा बंद. सिनेमा हॉल, मॉल्स, पार्क, समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, शिक्षण संस्था बंद राहतील.
65 वर्षांवरील लोक घरातच…
हॉस्पिटॅलिटी : रेड व ऑरेंज झोनमध्ये सर्व हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस बंद. ग्रीन आणि येलो झोनमध्ये उघडणे शक्य.
परिवहन : ग्रीन व येलो झोनमध्ये लोकल वाहतूक सुरू, मात्र रेड-ऑरेंजमध्ये बंद.
उड्डाणसेवा : भारताबाहेर विशेष व कमर्शियल सेवेत सूट. निवडक देशांसाठी मर्यादित सूट. येणारे प्रवासी ७ दिवस निगराणीत.
अबकारी : राज्यांना दारू दुकाने व इतर निर्मिती क्षेत्र उघडण्याची मुभा. यात कलर कोडिंग राज्य सरकारे निश्चित करतील.