मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी येणारे योगदान वाढताना दिसत आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १९७ कोटींचे योगदान जमा झाले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील जनतेने मोठा आर्थिक निधी जमा केला आहे.
या निधीत ८३ वेगवेगळ्या दानशूर घटकांनी प्रत्येकी २५ लाखांहून अधिक रकमेचे योगदान दिले आहेत. यामुळे हा आकडा १७० कोटी रुपयांपर्यंत झाला होता. पण मागच्या दोन दिवसांत ग्राफाईट इंडिया, ज्योती लॅब्स, नवीन फ्लूराईन इंटरनॅशनल, जगन्नाथ शेट्टी फाउंडेशन, ब्लू क्रॉस लेबर यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जमा केला. त्यानंतर या आकड्यात मोठी वाढ झाली.
या शिवाय चिमुकल्यांसह कित्येक व्यक्ती, संस्था, संघटना, उद्योजक, व्यावसायिकांनी या निधीत आपापल्या परिने भर टाकली. त्यामुळेच निधीत आतापर्यंत १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले आहेत.
‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९’
‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-१९’ हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक ३९२३९५९१७२० आहे. या देणग्यांना आयकर अधिनियम १९६ १च्या ८० (G) नुसार आयकर कपातीतून १०० टक्के सूट देण्यात येत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा  आधी ‘मातोश्री’ मग ‘वर्षा’… मध्यरात्रीनंतर अंबानी ठाकरे-शिंदेंना घरी जाऊन भेटले; चर्चांना उधाण!

खात्याची सविस्तर माहिती :
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300