मुंबई : कोरानाव्हायरसचा (coronavirus) नाश करतील अशी औषधं आणि लस अद्याप उपलब्ध नाही. आधीपासून जी औषधं उपलब्ध आहेत, त्याच औषधांचा सध्या वापर केला जातो आहे. अशा औषधांचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. यापैकी काही औषधं कोरोनाव्हायरसवर प्रभावी ठरत असल्याचं दिसलं आहे. ही औषधं म्हणजे कोरोनाग्रस्तांसाठी आशेचा किरण आहेत. भविष्यात यापैकीच काही औषधं कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरू शकतील. अशाच काही औषधांबाबत माहिती घेऊयात.

Remdesivir

हे एक अँटीव्हायरल औषध आहे. इबोलाच्या रुग्णांसाठीही या औषधाचा वापर करण्यात आला होता. कोरोनाव्हायरसलाही रोखण्यात हे औषध प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहें

1700 पेक्षा जास्त रुग्णांवर याचं क्लिनिकल ट्रायल झालं आहे. चीनमध्ये झालेल्या या ट्रायलचा रिझल्ट याच महिन्यात येऊ शकतो. Gilead Sciences या बायोटेक कंपनीही 2 ट्रायल सुरू केल्या आहेत, ज्याचा निकाल मेपर्यंत येईल.

अधिक वाचा  “ऐतिहासिक संसद भवनाचा निरोप घेताना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महत्त्वाचं भाष्य

Hydroxychloroquine

हे अँटी-मलेरिया ड्रग कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यात मदत करेल असं म्हटलं जातं आहे. हे औषध रुमेटाइड आर्थराइटिससारख्या ऑटोइम्युन आजारावरही दिलं जातं. Covid-19 वर त्याचा काय परिणाम होतो याचा शोध सुरू आहे. अमेरिकेत मान्यता मिळाल्याने बहुतेक कोरोना रुग्णांना हे औषध दिलं जातं आहे. यावर सुरू असलेल्या ट्रायल्सचा पुढील एका महिन्यात परिणाम दिसून येईल.

Hydroxychloroquine

हे एंटी-मलेरिया ड्रग कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यात मदत करेल असं म्हटलं जातं आहे. हे औषध रुमेटाइड आर्थराइटिससारख्या ऑटोइम्युन आजारावरही दिलं जातं. Covid-19 वर त्याचा काय परिणाम होतो याचा शोध सुरू आहे. अमेरिकेत मान्यता मिळाल्याने बहुतेक कोरोना रुग्णांना हे औषध दिलं जातं आहे. यावर सुरू असलेल्या ट्रायल्सचा पुढील एका महिन्यात परिणाम दिसून येईल.

अधिक वाचा  भारताचेही जशास तसे उत्तर कॅनडा राजदूताची हकालपट्टी, 5 दिवसांतच देश सोडण्याचे आदेश

Kevzar

हे औषध 2017 साली आर्थराइटिसच्या गंभीर रुग्णांसाठी मंजूर करण्यात आलं होतं. COVID-19 च्या सर्वात गंभीर रुग्णांवर हे औषध काम करत असल्याचं दिसून आलं आहे. विशेषत: त्यांच्यावर ज्यांची रोगप्रतिकारक प्रणाली ओव्हर एक्टिव झाली आहे आणि निरोगी पेशींचाही नाश करत आहेत.

Avigan

हे अँटीव्हायरस औषध आहे, ज्याने इन्फ्लूएंजावर उपचार केले जातात. या औषधाला जपान आणि चीनमध्ये परवानगी देण्यात आली आहे मात्र अमेरिकेत सध्या तरी त्याचा वापर होत नाही आहे. चीनमध्ये ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं ते याला इतर औषधांच्या तुलनेत जास्त प्रतिक्रिया देत होते. जवळपास 7 दिवस आधीच हे रुग्ण बरे होत होते. चीनमध्ये यावर ट्रायल सुरू आहे, ज्याचा परिमाण मेपर्यंत येईल.

अधिक वाचा  पोंक्षेंची पुन्हा गरळ: ‘बाजीराव पेशवे ही छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवणारा धुरंधर वीरपुरुष’

Kaletra

ही एक HIV थेरेपी आहे, ज्यामध्ये lopinavir आणि ritonavir ही 2 अँटीव्हायरल औषधं वापरली जातात. कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी काही ठिकाणी ही औषधं वापरली जात आहेत, विशेषत: चीनमध्ये. मात्र या औषधाचा फारसा परिणाम दिसून आला नाही.

Galidesivir

एका विशेष पद्धतीने व्हायरसशी लढण्यासाठी ही अँटीव्हायरल ट्रीटमेंट आहे. 2013 सालापासून यलो फिव्हर आणि इबोलावर उपचारासाठीही हे औषध वापरलं जातं आहे. आता कोरोनाशी लढण्यासाठी ब्राझीलमध्ये याचं क्निनिकल ट्रायल होतं आहे.