मुंबई : कोरोनाचे १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश *रेड झोन* मध्ये करण्यात आला आहे.
१५ पेक्षा कमी रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांना *ऑरेंज झोन* मध्ये ठेवण्यात आले आहे.
एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्याचा समावेश *ग्रीन झोन* मध्ये करण्यात आला आहे.

*रेड झोन जिल्हे* : मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड,नागपूर, औरंगाबाद, सांगलीचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे.

*ऑरेंज झोन जिल्हे* : कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड,जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा,वाशिम, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे.

अधिक वाचा  सोनिया गांधींकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल, रायबरेलीतून लोकसभा प्रियांका गांधी लढवणार?

*ग्रीन झोन जिल्हे* : नांदेड, चंद्रपूर,भंडारा, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, परभणीचा समावेश आहे.
*रेड झोनमध्ये असेल तर*
ज्या जिल्ह्यांना रेड झोन जाहीर करण्यात आले त्या सर्व जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आता सुरुच राहणार असून, तेथील निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
*ऑरेंज झोन असेल तर*
ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. तिथले निर्बध काही प्रमाणात शिथिल करण्यात येतील.