पुणे : १४ एप्रिल १९७८ रोजी माझा जन्म झाला आणि आज १४ एप्रिल २०२० रोजी मला वय वर्ष ४२ पुर्ण झाले . आज पर्यंत चे जेवढे काही वाढदिवस मी साजरे केले त्या पैकी हा माझा अविस्मरनिय राहणार वाढदिवस ठरणार आहे .
वाढदिवस म्हटले की आपले आई,वडील ,भाऊ ,बहिण, नातेवाईक ,मित्र, समाज बांधव ,आणि इतर सर्व जन आपल्या आयुष्यवंत हो,सुखी रहा ,अशे अनेक आशीर्वाद रुपी शुभेच्छा देतात..पण मित्रानो आजचा हा दिवस माझा साजरा करण्याचा नसून आपल्या सर्वांना एक अतिशय मौल्यवान असा संदेश देण्यासाठी आणि विनंती करण्यासाठीचा आहे.
मित्रांनो, आज करोना च्या प्रदुर्भावमुळे संपूर्ण जगात हा मजला आहे. माझे मन अतिशय दुःखी होत आहे, कारण आज या मुळे अनेक लोकाना करोनाचे संक्रमण झाले आहे. अनेक जणांचा मृत्यू देखील झाला आहे. अनेक मृत्यच्या दारात आहेत. मित्रानो, आपल्याल्या हे थांबवलेच पाहिजे. हे थांबवण्याकरीता आपल्याला स्वतःला लॉक-डाउन करून घेतले पाहिजे.
सोशल डीस्टेनसिंगचे पालन अतिशय कटीबद्ध पणे केले पाहिजे. मी आज आपणास सांगू इच्छितो की, लॉकडाऊन झाल्या पासून एक ही दिवस मी आणि माझ्या परिवाराने शासन नियम भंग केला नाही.
मला आसे वाटत आहे की, .मित्रानो नियमांचे कटिबद्ध पणे पालन करा आणि सुरक्षितता बाळगा आणि सुरक्षित राहा.आपण सर्वजण मिळून या करोना व्हायरसचा नायनाट करायचा आहे आणि संपूर्ण जगाला आणि आपल्या देशाला या संकटातुन बाहेर काढुयात.
मित्रानो, आपल्या प्रत्येकाचे जीवन हे अमूल्य आहे. प्रत्येकच आई बाबांना आपले मुले प्रिय असते आणि प्रत्येक मुलांना आपले आई बाबा .भाऊ बाहीन व सर्वच जण तसेच सर्व विश्व हे माझे बंधू भाऊ आहेत आणि सर्व भारतीय माझे बांधव आहे .तसेच प्रत्येक व्यक्ती ला आपल्या वाढदिवसाची ओढ असते आणि मग जर आपल्या सर्वांना आपला व आपल्या प्रिय जणांचे येणारे वाढदिवसान मध्ये सहभागी व्हायचे असेल तर सर्वांनी आप आपली सुरक्षितता बाळगली पाहिजे व या आलेली महामारी वर मात करावयाचे आहे व प्रथम स्वतः ,आपला परिवार,आपला समाज,आपली वस्ती,आपली वाडी,आपली कॉलोनी ,आपल कुंज,आपली गल्ली ,आपली बिल्डिंग, आपला वार्ड ,आपला प्रभाग,आपला विभाग,आपले गाव,आपले शहर, आपले राज्य ,आपला देश, आणि आपले सर्व विश्व या संकटातून बाहेर काढायचे आहे..चला, तर मग सर्वांच्या भविष्यासाठी घरात राहू नियम पाळू आणि सामाजिक जबाबदारी पार पाडू.