नवी दिल्ली : करोना व्हायरसविरुद्ध लढाईत जगातील अनेक देशांसाठी भारत एक ‘देवदूत’ ठरलाय. १३० कोटी जनसंख्या असलेल्या भारतानं लॉकडाऊनसारखे कठोर उपाय लागू करत इतर देशांच्या तुलनेत करोनावर बऱ्यापैंकी नियंत्रण मिळवलंय असं म्हणायला हरकत नाही. परंतु, भारतानं आपल्या नागरिकांसोबतच इतर देशांसाठी आपल्या औषधांचं भांडार खुलं केलंय. अमेरिकासारखी महाशक्ती असो… युरोपीय देश असो किंवा सार्कचे इतर सहयोगी देश… मानवता सर्वोच्च स्थानी ठेवत भारतानं प्रत्येक देशाला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या औषधांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ (HCQ) साठी भारतानं १३ देशांची यादी तयार केलीय.
न्यूज एजन्सी ‘एएनआय’नं दिलेल्या माहितीनुसार, भारतानं ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यासाठी या काळात गरजेनुसार १३ देशांची एक यादी बनवली आहे. यानुसार,

अधिक वाचा  विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे समितीचा अहवालावर मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय, मराठा आरक्षणाचा विषय…

– अमेरिकेननं ४८ लाख टॅबलेटची मागणी केली होती. परंतु, या देशाला सध्या ३५.८२ लाख टॅबलेट दिल्या जातील
– जर्मनीला ५० लाख ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ टॅबलेट पाठवण्यात येतील
– भारताचा शेजारी आणि सार्क सहकारी बांग्लादेशला २० लाख ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ टॅबलेटचा पुरवठा केला जाईल
– नेपाळला १० लाख टॅबलेट
– भूतानला २ लाख टॅबलेट
– श्रीलंकेला १० लाख टॅबलेट
– अफगाणिस्तानला ५ लाख
– तर मालदीवला २ लाख ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ टॅबलेटचा पुरवठा करण्याचा निर्णय भारतानं घेतलाय.
औषधं बनवण्यासाठी कच्चा माल पाठवणार
तसंच भारत अमेरिका, ब्राझील आणि जर्मनीला ‘ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडेंटस’ (API) पाठवणार आहे. याचा उपयोग औषधं बनवण्यासाठी केला जातो. अमेरिकेला आत्तापर्यंत ९ मेट्रिक टन API पाठवण्यात आलं आहे. तर जर्मनीला पहिला टप्प्यात १.५ मेट्रिक टन API पाठवण्यात आलंय. तर ब्राझीलला पहिल्या टप्प्यातील ०.५० मेट्रिक टन API लवकरच पाठवण्यात येणार आहे.
भारत मोठा उत्पादक देश
उल्लेखनीय म्हणजे, करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी एन्टी मलेरिया मेडिसीन ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ आणि पॅरासिटामॉल वापरण्यात येत आहे. या औषधांचा भारत हा मोठा उत्पादक आहे.