पाटणाः करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे काहींनी सरकारचे प्रयत्न हाणून पाडण्याचा कट रचला आहे. बिहारच्या पश्चिम चंपारण (बेतिया)च्या जिल्हाधिकाऱ्यांच्या एका पत्रातून हा प्रकार समोर आला आहे. सीमेपलिकडून काही जणांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न असून करोना फैलावण्याचा त्यांचा कट आहे, असं जिल्हाधिकारी कुंदन कुमार यांनी म्हटलंय.
पोलीस अधीक्षक आणि सशस्त्र सीमा दलाच्या ४७च्या बटालीयनला कुंदन कुमार यांनी हे पत्र लिहिलंय. करोनाचा संसर्ग झालेल्यांना सीमेपलिकडून भारतात घुसखोरी करून दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात ४० ते ५० जणांचा समावेश आहे. करोनाचा संसर्ग फैलावण्याचा त्यांचा कट आहे, कुंदन कुमार यांनी पत्रात म्हटलं आहे.
भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेले सर्व जण हे मुस्लिम आहेत. या सर्वांना जालीम नावाच्या एक म्होरक्या त्यांना भारतात दाखल करण्याच्या प्रयत्नात आहे. जालीम हा शस्त्रास्त्रांची तस्करी करतो. तो नेपाळच्या पारसा जिल्ह्यातील जग्रनाथपूर गावात राहतो, अशी माहितीही कुंदन कुमार यांनी पत्रात दिलीय. नेपाळ सीमेतून करोनाचा संसर्ग झालेल्यांना भारतात दाखल करण्याचा जालीम याचा कट आहे. सशस्त्र सीमा दलाने (SSB) सीमेवर चौकशी वाढवावी. कुठल्याही संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावं, असं कुंदन कुमार यांनी म्हटलंय.
बेतियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रानंतर तपास सुरू आहे. कुणालाही घुसू दिले जाणार नाही. आम्ही आपल्या अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. अजून संशयित घुसले नाहीत तर घुसण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती बिहारचे गृहसचिव अमीर सुबानी यांनी दिली. लॉकडाऊनच्या नियमांचं कठोर पालन करत आहोत. नेपाळकडूनही कडक सुरक्षा ठेवण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी गुप्तचर माहितीच्या आधारावर हे पत्र दिले आहे. यामुळे आम्ही अधिक सतर्क झालो आहेत, अशी माहिती सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकांनी दिली. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. आतापर्यंत ६० करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

अधिक वाचा  ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या गुंड जयेश पुजारीची कोर्ट परिसरात नागरिकांकडून धुलाई