मुंबई: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी देशातील करोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात १ हजार ५०० कोटींची मदत जाहीर केली होती. रतन टाटा सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाहिताबाबतचे अनेक मुद्द्यांवर आपली मते व्यक्त करत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून रतन टाटांच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मेसेज करोना व्हायरस संदर्भातील आहे. या पोस्टवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली असून ही पोस्ट आपण लिहली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागले. इतक नव्हे तर संबंधित पोस्ट कोणी लिहली त्याच शोध लावण्याची विनंती त्यांनी केली.
रतन टाटांनी आज (शनिवारी) एक पोस्ट त्यांच्या ट्विटवर शेअर केली. ते म्हणतात, खालील पोस्ट मी लिहली नाही किंवा तसे बोललो देखील नाही. मी तुम्हाला विनंती करतो की व्हॉट्सअॅप किंवा अन्य सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टची सत्यता तपासून पाहावी. मला काहीही सांगायचे असेल तर ते मी माझ्या अधिकृत चॅनलच्या माध्यमातून सांगतो. तुम्ही सर्व जण सुरक्षित असाल अशी अपेक्षा करतो. काळजी घ्या.
या पोस्टच्या सोबत रतन टाटांनी एक फोटो जोडला आहे. संबंधित फोटोत काही मजकूर लिहला आहे. त्यावर रतन टाटांचा फोटो देखील आहे.
व्हेरी मोटिवेशनल अॅट धिस अवर- असे या पोस्टचे शिर्षक आहे.
तज्ञांच्या मते करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्था संकटात जाईल. मला या तज्ञांच्या बद्दल फार माहिती नाही. पण त्यांना व्यक्तीच्या प्रेरणा आणि केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल काहीच माहीती नाही.दुसऱ्या महायुद्धात सर्व काही नष्ट झाले होते. जपानचे काहीच भविष्य नव्हते. पण केवळ ३ दशकात जपानने अमेरिकेला बाजारेपेठेत रडवले. जर तज्ञांवर विश्वास ठेवला तर अरब देश इस्त्रायलचे अस्तीत्व जगाच्या नकाशावरून नष्ट करतील. पण खरी परिस्थिती काही वेगळीच आहे.
तज्ञांच्या मत विचारात घेतले तर भारत १९८३ मध्ये वर्ल्ड कप जिंकला नसता. चालता ही न येणारी धावपटू विल्मा रुडोल्फला कधीच चार सुवर्णपदक जिंकता आले नसते. अरुणीमा सहज आयुष्य जगू शकली असती. पण ती माऊंट एव्हरेस्टवर यशस्वीपणे पोहोचली. करोना संकट हे काही वेगळे नाही. आपण करोनावर मात करू आणि भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होईल यात काही शंका नाही, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अधिक वाचा  विराट कोहली भारत कायमचा सोडणार? ‘या’ देशात होणार स्थायिक; दोघे या कंपनीचे संचालकही झाले