मुंबई – शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या मुंबईकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. अशातच मुंबईतील धारावी झोपडपट्टी भागात देखील कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले असून अत्यंत दाट लोकसंख्या असलेल्या या भागामध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून मुंबई महापालिकेने धारावी भागामध्ये स्क्रीनिंग करण्यास सुरुवात केली असून या तपासणीसाठी महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे १५० डॉक्टर्स महापालिकेला मदत करत आहेत.
या मोहिमेअंतर्गत मुंबई महापालिकेचे आरोग्य कर्मचारी व महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे १५० डॉक्टर्स धारावी भागामध्ये घरोघरी फिरून येथील नागरिकांचे इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे स्क्रीनिंग करत आहेत.