करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने तीन टप्प्यांचा प्लान तयार केला आहे. आपातकालीन परिस्थिती आणि आरोग्य व्यवस्थेच्या तयारीसाठी मोदी सरकारने राज्यांना पॅकेज जारी केलं आहे. केंद्रीय आणि राज्य स्तरावरील आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचा या पॅकेज मागचा उद्देश आहे.
या पॅकेजमुळे राज्यांना अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधे खरेदी करता येतील तसेच Covid-19 च्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याची क्षमता वाढवता येणार आहे. केंद्र सरकारने करोनाविरोधात दीर्घकाळ लढाईच्या दृष्टीने तयारी केली आहे. तीन टप्प्यांमध्ये या प्रकल्पाची अंमलजबजावणी केली जाणार आहे.
पहिला टप्पा जानेवारी २०२० ते जून २०२०,

अधिक वाचा  खार-वांद्रे प. उपनगरातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

दुसरा जुलै २०२० ते मार्च २०२१ आणि

तिसरा टप्पा एप्रिल २०२१ ते मार्च २०२४ असा असेल.

“करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आणि राज्य स्तरावरील आरोग्य यंत्रणा मजबूत करणे, अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांची खरेदी, टेहळणी क्षमता वाढवणे त्याचबरोबर प्रयोगशाळांची संख्या वाढवणे हा Covid-19 आपातकालीन योजनेमागचा उद्देश आहे” असे केंद्राने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
जानेवारी २०२० ते जून २०२० या पहिल्या फेजच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य मोहिमेतंर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

पहिल्या फेजमध्ये Covid-19 साठी खास रुग्णालयांची उभारणी, आयसोलेशन वॉर्डस, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनसह आयसीयू कक्ष, प्रयोगशाळा सक्षमीकरण, अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल.
व्यक्तीगत सुरक्षा उपकरणे, एन-९५ मास्क आणि व्हेंटिलेटर्सच्या खरेदीसाठी निधीचा वापर करा, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. रुग्णालये, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्याचाही यामध्ये समावेश आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांमधून हा प्लान बनवण्यात आला आहे. Covid-19 विरोधात लढण्यासाठी राज्यांकडून विशेष मदतीच्या पॅकेजची मागणी करण्यात येत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली त्यावेळी सुद्धा या मुद्दावर चर्चा झाली होती.