नवी दिल्ली: भारतात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली. आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकड्यांनुसार देशात आत्तापर्यंत ६४१२ रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. तर १९९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. करोनाचा सर्वात जास्त प्रभाव महाराष्ट्रात दिसून आलाय. मृतांपैंकी ९७ जण महाराष्ट्रातील आहेत म्हणजेच देशभरातील मृतांच्या संख्येच्या जवळपास ५० टक्के… देशात कोणत्या राज्यात किती करोनाबाधित रुग्ण आढळलेत त्यावर एक नजर टाकुयात…
- क्र. राज्य पॉझिटिव्ह केस (७१ परदेशी) डिस्चार्ज मृत्यू
- आंध्र प्रदेश ३४८ ६ ४
- अंदमान निकोबार ११ ० ०
- अरुणाचल प्रदेश १ ० ०
- आसाम २९ ० ०
- बिहार ३९ ० १
- चंडीगड १८ ७ ०
- छत्तीसगड १० ९ ०
- दिल्ली ७२० २५ १२
- गोवा ७ ० ०
- गुजरात २४१ २६ १७
- हरियाणा १६९ २९ ३
- हिमाचल प्रदेश १८ २ १
- जम्मू-काश्मीर १५८ ४ ४
- झारखंड १३ ० १
- कर्नाटक १८१ २८ ५
- केरळ ३५७ ९६ २
- लडाख १५ १० ०
- मध्य प्रदेश २५९ ० १६
- महाराष्ट्र १,३६४ १२५ ९७
- मणिपूर २ १ ०
- मिझोरम १ ० ०
- ओडिशा ४४ २ १
- पुदुच्चेरी ५ १ ०
- पंजाब १०१ ४ ८
- राजस्थान ४६३ २१ ३
- तामिळनाडू ८३४ २१ ८
- तेलंगणा ४४२ ३५ ७
- त्रिपुरा १ ० ०
- उत्तराखंड ३५ ५ ०
- उत्तर प्रदेश ४१० ३१ ४
- पश्चिम बंगाल ११६ १६ ५
- एकूण ६,४१२* ५०४ १९९
- करोनाशी संबंधीत हेल्पलाईन क्रमांक
- कोणतीही माहिती मिळवण्यासाठी +९१-११-२३९७८०४६ या क्रमांकावर फोन करा. याशिवाय राज्यांनीही आपले हेल्पलाईन क्रमांक जारी केलेले आहेत.
मानसिक समस्यांसाठी हेल्पलाईन
सामाजिक अंतर, घरातच अडकून पडावे लागल्यामुळे मात्र, अनेक व्यक्तींना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकारने अशा व्यक्तींसाठी ०८०४६११०००७ या टोल-फ्री क्रमांकावर हेल्पलाइन उपलब्ध करून दिली आहे.
कोविड १९ : महाराष्ट्र हेल्पलाईन
महाराष्ट्रातील नागरिकांनी करोना व्हायरसशी संबंधित अधिकृत माहिती मिळवण्यासाठी पुढील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा
राज्य नियंत्रण कक्ष : ०२० – २६१२७३९४
टोल फ्री नंबर : १०४
राष्ट्रीय कॉल सेंटर : +९१ ११ २३९७८०४६