नवी दिल्ली : करोनाशी लढा देण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सरकारने मास्क, व्हेंटीलेटर्स, करोना चाचणी किट यासारख्या उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द केले आहे. यामुळे या उत्पादनांची कमी किंमतीत आयात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
करोनाग्रस्तांची संख्या वाढु लागल्याने औषधांची आणि उपकरणांची मागणी वाढली आहे. करोना चाचणी किट वाजवी दरात उपलब्ध व्हावीत, यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सरकारने मास्क, व्हेंटीलेटर्स, करोना चाचणी किट यासारख्या उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द केले आहे.
देशभरात करोना झपाट्याने वाढत आहे. करोना रोखण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. लाॅकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करोनाचे रुग्ण वाढल्यास मास्क, वैयक्तिक सुरक्षा उपकरणे , व्हेंटीलेटर्सची चणचण जाणवू नये, यासाठी आयातीवरील सीमा शुल्क रद्द करण्यात आले आहे. यामुळे कंपन्यांना या उपकरणांची आयात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यात समिती
करोनाग्र्स्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्य सेवक, डाॅक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा उपकरणे पुरवली जात आहेत. ही उपकरणे आयात करताना त्यावरील सीमा शुल्क रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने यापूर्वीच अमेरिकेसह काही देशांना मलेरिया प्रतिबंधात्मक औषधे आणि पॅरासिटामोल या औषधांची निर्यात केली आहे.