राज्यात सर्वसामान्यांना शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा काय लोकांनी उपाशी राहावं का? असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे. राज्य सरकारमध्ये नियोजनाचा आभाव दिसून येतो. राज्याच्या वतीने अद्याप ठोस भूमिका दिसून येत नसल्याची खंतही फडणवीस यांनी व्यक्त केली.
शिवभोजन लाख-दीड लाख लोकांना दिलं जाते. त्यामुळे गरिबांच्या पोटाला अन्न मिळतेय. पण शिवभोजन तर फक्त दिवसातून फक्त एकदाच दिलं जाते. दोनदा दिलं जात नाही. तेही फक्त दोन-तीन तास. लोकांनी एकदाच जेवावं आणि दुसऱ्यांदा उपाशी राहावे, असं तर आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने सर्वसामान्या लोकांच्या खाण्यापिण्यासाठी योग्य नियोजन करावे. कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जेवण पोहचवावं. सरकारने प्रक्टीकल विचार करायला हवा. तसेच सरकारचे अंग बचावचे धोरणही चुकीचं आहे. लवकरच सरकारने आपलं धोरण बदलावं अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडी सरकारवर केली आहे.
आमची पहिल्या दिवसांपासूनची भूमिका आहे की, आम्ही सरकारकवर कोणतीही टीका करणार नाही किंवा विरोध करणार नाही. संकटाच्या समयी आम्ही सरकारसोबत आहोत, असही फडणवीस म्हणाले..
दळण-वळण बंद असल्यामुळे रोजदांरी करणारे आणि सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत. त्यातच भर म्हणून किराणा दुकानदारांनी सामानांच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ केली आहे. मध्यमवर्गीय महिना-दोन महिने माल खरेदी करू शकतात पण त्यानंतर पुढे सर्वजण रेशनच्या दुकानासमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडून आलेला माल तात्काल रेशनपर्यंत पोहच करून तीन महिन्यापर्यंतचे मोफत धान्य उपलबद्ध करून द्यावे अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे.
थाळ्या किंवा टाळ्या वाजवणे अथवा दिवा लावणे हा लॉकडाउनमधील महत्वाचा भाग आहे. कारण, आपले हेल्थ वर्कर सर्वात जास्त स्ट्रेसमध्ये आहेत. त्यांना एकटेपणा जाणवतोय. त्यांना असं वाटतेय की एका संकटाचा सामना आम्ही करतोय. त्यावेळी प्रत्येक व्यक्तीला तो कितीही मोठा असो. त्या व्यक्तीला मानसिक आधाराची गरज असते. कोणीतरी त्यांना म्हणावे लागते की आम्ही तुमच्या सोबत आहोत. देशांमध्ये गरीब आहेत त्यांना उद्या काय होणार हे माहित नाही, अशआ लोकांनाही मानसिक आधाराची आवश्कता आहे. म्हणून या दोन्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून हा देश एक आहे. कोणीही एकटा लढत नाही. आपण सगळे मिळून लढतोय. ही भावना मोदी यांनी तयार केली. काही लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनावर टीका केली. या टीकाकारांना जनतेने आपल्या कार्यातून उत्तर दिले. कारण आपण फक्त थाळ्या-टाळ्या वाजवत नाही तर जमिनीवरील कर्तुत्व सिद्ध केले आहे. असं मत फडणवीस यांनी मुलाखतीत व्यक्त केलं आहे.
राज्य सरकारचे कामकाज कसं आहे. लॉकडाउनमध्ये वेळेवर घेतला आहे. मरकजमध्ये सहभागी झालेले किती लोक राज्यात आहेत. हे अजूनही राज्य सरकार शोधू शकलेलं नाही. त्यामुळे राज्य सरकार यात ढिलाई दाखवत आहे का? या संकटाच्या वेळीही राज्य सरकार मतांचं राजकारण करत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे, असे अनेक सडेतोड उत्तरे फडणवीस यांनी मुलाखतीत दिली आहे.

अधिक वाचा  रतन टाटा अनंतात विलिन! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार