नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 5734 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 549 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाने आतापर्यंत 166 जणांचा बळी घेतला आहे. तर 473 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने 2500 डॉक्टर्स आणि 35,000 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तैनात केलं आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी देशभरातील 586 हेल्थ युनिट टीम, 45 उपविभागीय हॉस्पिटल, 56 विभागीय हॉस्पिटल, 8 प्रोडक्शन युनिट हॉस्पिटल आणि 16 क्षेत्रिय हॉस्पिटल पूर्णपणे सज्ज झाले आहेत, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं. आतापर्यंत 1.7 कोटी पीपीईची ऑर्डर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 49,000 व्हेंटिलिटर्सचीदेखील ऑर्डर दिली गेली आहे, असं देखील अग्रवाल यांनी सांगितली.

अधिक वाचा  रतन टाटा यांनी कठीण काळात आयपीएलसाठी उघडला होता खजिना