मुंबई : महाराष्ट्रात CoronaVirus कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांशी संवाद साधत त्याना धीर दिला आहे. परिस्थितीचं गांभीर्य जाणत गेल्या कित्येक दिवसांपासून ते स्वत: युद्धपातळीने त्यांच्यासोबत असणाऱ्या मंत्रीमडळाच्या साथीने मोठे निर्णय घेताना दिसत आहे.
बुधवारीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असताना त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अतिशय सोप्या भाषेत सर्वांपुढे मांले. ज्यामध्ये धान्य वाटपापपासून ते अगदी अन्नछत्र आणि आरोग्यसेवांपर्यंतचा आढावा घेण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांनी राज्याला संबोधित करताना मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे :
* परिस्थिती बिघडत असल्याचं न नाकारता मुख्यमंत्र्यांना नागरिकांना धीर दिला. सध्याच्या घडीला घाबरुन न जाता सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असण्यावर त्यांनी भर दिला.
* राज्यात सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या अन्नछत्रांमध्ये नाश्ता आणि जेवणआसोबतच गरजूंसाठी प्राथमिक वैद्कीय सेवा आणि डॉक्टर्सही उपलब्ध असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली.
* कोरोनाशी लढा देत असतेवेळी सध्याच्या घडीला जितक्या जिद्दीने सर्वजण सामोरे जात आहेत तितक्यात किंबहुना त्याहीपेक्षा जास्त जिद्दीने का कोरोना संपल्यानंतर परिस्थितीचा सामना करावा लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
* येत्या काळात अर्थव्यवस्थेवर येणारा ताण पाहता, त्याच्याशी दोन करण्यासाठी नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी शारीरिक, मानसिक अशा सर्वच स्तरांवर सज्ज राहण्याचा इशारा दिला.
* मधुमेह, स्थुलता, रक्तदाब यांसारख्या आजारांशी झुंजणाऱ्यांनी या परिस्थितीला त्यांच्या आहाराच्या सवयींवर विशेष काळजी द्यावी हा मुद्दा त्यांनी अधओरेखित केला. अशा व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याची वास्तवदर्शी परिस्थिती सर्वांपुढे आणत त्यांनी या व्यक्तींना काळजी घेण्याचा सल्ला दिला.
* राज्यातील आरोग्य यंत्रणांवर येणारा एकंदर ताण पाहता, कोरोनाग्रस्त रुग्ण कोणत्याही रुग्णालयात जाऊन संसर्गाचा धोका वाढू नये, यासाठी आता आरोग्य सेवांची चार तुकड्यांमध्ये विभागणी केल्याचं सांगितलं. ज्यामध्ये सर्दी खोकला ताप, कोरोनाची सौम्य लक्षण आणि कोरोनाची तीव्र लक्षणं असणाऱ्या रुग्णांची विभागणी करुन त्या अनुशंगाने त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
* मध्यमवर्गीय आणि केशरी शिधापत्रिका धारकांसाठी राज्यात 3 किलो गहू आठ रुपये प्रतिकिलो दराने आणि 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रतिकिसो दराने धान्यसाठी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांत प्रशासनाची पावलं.
* राज्यातील आरोग्य यंत्रणांवरील ताण पाहता मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित, वैद्यकिय सेवांमध्ये काम केलेले निवृत्त सैनिक आणि इतर इच्छुकांनी स्वत:हून पुढाकार घेत रुग्णसेवेत सहकार्य करण्यातं आवाहन केलं. ज्या धर्तीवर इच्छुकांनी [email protected] या मेल आयडीवर त्यांच्या माहितीचा तपशील देणं अपेक्षित आहे. (या मेलवर इतरत्र गोष्टी, निरोप, सल्ले न देण्याची विनंती)
* कोरोनादरम्यानच्या काळात आता सर्वांनीच मास्कर वापरणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. अतिशय आवश्यक कामासाठी घराबाहेर पडत असल्यास मास्क वापरा, वापर केल्यानंतर फेकून दिल्या जाणाऱ्या मास्कची नीट विल्हेवाट लावा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा अशी विनंती त्यांनी केली.
* कोरोनासोबतचा हा लढा आपण सर्वजण मिळून जिंकणार असा दृढ निश्चय आणि आतमविश्वास व्यक्त करत त्यांनी राज्यातीव नागरीकांचं सहकार्य मागितलं. शिवाय तुमची घरं म्हणजे सुरक्षित गडकिल्लेच आहेत. त्यामुळे घरातच राहून कोरोनापासून सुरक्षित राहा असं आवाहन त्यांनी केलं.