मुंबई : देशात कोरोनानं अशरक्ष: थैमान घातलं आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजार 180 हून अधिक गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर 149 रुणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रत्येक राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान याच वेळी दिल्लीतील निजामुद्दीन इथे झालेल्या कार्याक्रमात तबलिगी जमातचे अनेक लोक लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश होता. त्यापैकी 1400 लोक राज्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपो यांनी दिली होती. त्यापैकी सर्व तबलिगींना शोधून त्यांच्या कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र अनेक तबलिगीचे नागरिक अद्यापही मोबाईल बंद ठेवून लपून बसले आहेत. अशा सर्व लोकांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आवाहन केलं आहे. त्यांनी स्वत:हून चाचणी कऱण्यासाठी समोर यावं अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई कऱण्याचे आदेश देण्यात येतील असं गृहमंत्र्यांनी ट्वीटही केलं आहे.
दरम्यान आज धारवी इथे पोलिसांनी तबलिगीच्या 5 जणांना पकडलं आहे. धारवीत आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 9 वर पोहोचली आहे. धारावीत कोरोना पसरण्याचं कनेक्शन निजामुद्दीनच्या कार्यक्रमासोबत आहे अशी चर्चा सुरू होती. त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी जागोजागी शोधमोहीम सुरू केली आहे. ‘निजामुद्दीन, दिल्ली येथील तब्लीगी मर्कज़ मध्ये जी लोकं सामील झाले होते त्यांतील अजूनही 50-60 जण आपला मोबाईल बंद करून लपलेले आहेत. त्यंना सूचित करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या पोलिस स्टेशनला नोंद करून घ्यावी व त्याचबरोबर टेस्टिंग करून क्वॉवरनटाय्न मध्ये भरती व्हावे, असं न केल्यास, पोलिसांकडून त्यांच्यावर कठोरात-कठोर कारवाईचे मी निर्देश दिले आहेत.’ असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. हे निर्देश गृहमंत्रालयाकडून देऊनही अनेक नागरिक आपला मोबाईल बंद ठेवून लपून बसले आहेत. या सर्वांच्या मागवर पोलीस असल्याची माहिती मिळत आहे.
निजामुद्दीन, दिल्ली येथील तब्लीगी मर्कज़ मध्ये जी लोकं सामील झाले होते त्यांतील अजूनही ५०-६० जण आपला मोबाईल बंद करून लपलेले आहेत. त्यंना सूचित करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या पोलिस स्टेशनला नोंद करून घ्यावी व त्याचबरोबर टेस्टिंग करून क्वॉवरनटाय्न मध्ये भरती व्हावे.
निजामुद्दीन, दिल्ली येथील तब्लीगी मर्कज़ मध्ये जी लोकं सामील झाले होते त्यांतील अजूनही ५०-६० जण आपला मोबाईल बंद करून लपलेले आहेत. त्यंना सूचित करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या पोलिस स्टेशनला नोंद करून घ्यावी व त्याचबरोबर टेस्टिंग करून क्वॉवरनटाय्न मध्ये भरती व्हावे.
मंगळवारी मुंबई पोलिसांनी तबलिगी जमातीमधील 150 जणांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आलेले हे 150 जण मर्कज करता दिल्ली येथे गेले होते. मरकज कार्यक्रमाला गेलेल्यांनी तात्काळ पोलीस आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले होते. मात्र या आव्हानाला न जुमानता स्वत:बाबतची माहिती लपवली म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.