पुणे (प्रतिनिधी) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील खडक, फरासखाना, स्वारगेट आणि कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही भाग तब्बल सात दिवस सील करण्यात आला आहे. पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सोमवारी रात्री उशिरा यासंदर्भात आदेश काढले आहेत. त्यामुळे आता या भागातील नागरिकांना बाहेर जाता येणार नाही. तसेच बाहेरच्या नागरिकांना या परिसरात प्रवेश करता येणार नाही. कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा आदेश काढण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुण्यात वाहनाच्या संचारास देखील बंदी घालण्यात आली आहे. तरीही शहराच्या काही भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातील काही भागात कोरोनाचे अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महापालिककेने काही परिसर निश्चित केला असून त्यानुसार पोलिसांनी चार पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांच्या संचारास फिरण्यास, उभे राहण्यास बंदी घालण्याचा आदेश काढला आहे.

अधिक वाचा  एनडीए राजकीय व्यवस्थेचे ‘ऑर्गेनिक अलायन्स’!; हा फक्तं पक्षांचा गोतावळा नाही जनतेच्या विश्वासाचा वटवृक्ष: मोदी

शहरातील या भागात असणार संचारबंदी…..

खडक पोलिस ठाणे

मक्का मस्जिद, यादगार बेकरी ते दलाल चौक- मोहसीन जनरल स्टोअर्स-शमा फॅब्रिकेशन- शहीद भगतसिंग चौक-उल्हास मित्र मंडळ-राजा टॉवर- इम्युनल चर्चची मागील बाजू-हाजी इसाक शेख उद्दीन पथ- पुष्पम ज्वेलर्स मंगल क्लब जवळ महाराणा प्रताप रस्ता- मीठ गंज पोलिस चौकी- रॉयल केटर समोरील बोळ- जाहिद लेडीज टेलर्स- चाँदतारा चौक-मदिना केटरर्स-घोरपडे पेठ पोलिस चौकी- इक्बाल स्क्रॅप सेंटर या ठिकाणचे आतील परिसर.

फरासखाना पोलिस स्टेशन-

मंगळवार पेठेतील, कागदी पुरा ३३०, मंगळवार पेठ १५७, मंगळवार पेठ गाडीतळ चौक कामगार पुतळा रस्ता २२०, मंगळवार पेठ २२४, मंगळवार पेठ २२६.
रविवार पेठ – गोविंद हलवाई चौक, हमजेखान चौक-गुरुद्वारा रस्ता देवजी बाबा चौक.

अधिक वाचा  राज्यात आगामी काळात धक्कादायक घडामोडी? मोदींचे मंत्रिमंडळ मुख्यमंत्री शिंदे अन् आठवलेंना कॅबिनेटपद नाही

स्वारगेट पोलिस ठाणे-

मीनाताई ठाकरे वसाहत कमान- महर्षी नगर पासून ते गिरीधर भवन चौकापर्यंत रस्त्याचा डावीकडील भाग.

महावीर प्रतिष्ठान पासून राधास्वामी सत्संग व्यासकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेले सूर्यमुखी गणेश मंदिर पासून पुढे राधा स्वामी सत्संग व्यास पर्यंतची डावीकडील बाजू
राधास्वामी सत्संग व्यास पासून डायस प्लॉट चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डायस प्लॉट चौकापर्यंतच्या डाव्या बाजूला खिलारे वस्ती, पी एन टी कॉलनी यांच्या सीमा भिंतीपर्यंतचा भाग राधास्वामी सत्संग व्यास पासून डायस प्लॉट चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डायस प्लॉट चौकापर्यंतच्या उजव्या बाजूचा भाग.

डायस प्लॉट चौक ते सेव्हन लव्ह चौकाकडे जाणाऱ्या डायस प्लॉट रस्त्यावरील उजवीकडील भाग डायस प्लॉट चौकाकडून लक्ष्मीनारायण चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचा डायस प्लॉट चौकापासून मीनाताई ठाकरे वसाहत समान पर्यंतचा डावीकडील भाग.
गिरीधर भवन चौक ते डायस प्लॉट चौक या रस्त्याच्या उजव्या व डाव्या बाजूचा भाग डायस प्लॉट चौक ते राधा स्वामी सत्संग व्यास दरम्यानचा रस्ता.

अधिक वाचा  NEET कौन्सिलिंगबाबत मोठी अपडेट; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय काय?

कोंढवा पोलिस ठाणे-

अशोका म्यूज सोसायटी- आशीर्वाद चौक- मिठानगर-सत्यानंद हॉस्पिटल गल्ली-भैरोबा मंदिर पीएमटी बसस्टॉप-संत गाडगे महाराज शाळा-साई मंदिर ब्रम्हा अवेन्यू सोसायटी-शालिमार सोसायटी- कुमार पृथ्वी गंगा धाम रस्ता- मलिक नगर.