मुंबई : २० फेब्रुवारीपर्यंत देशात कोरोनाची परिस्थिती एवढी गंभीर नव्हती. तेव्हाच मी ‘गो कोरोना, कोरोना गो’ चा नारा दिला होता. तेव्हा लोकं असं बोलून कोरोना जाणार का? अशी खिल्ली उडवत होते. पण आज आपण पाहतोय हाच नारा संपूर्ण जग देत आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी दिली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रामदास आठवलेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रामदास आठवले अनेक लोकं आणि चीन व्यक्तीसोबत ‘गो कोरोना, कोरोना गो’ असा नारा देत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. पण आता हाच नारा संपूर्ण जग देत असून देश कोरोनामुक्त होण्याची वाट पाहत आहेत.
रामदास आठवलेंचा ‘तो’ व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. केंद्रीय मंत्री रामदास आठवले लॉकडाऊनच्या काळात पत्नीसोबत किचनमध्ये जेवण करताना दिसले. कोरोना विरुद्ध लढा यशस्वी करण्यासाठी लोकडाऊनमध्ये घरीच राहा.आवडत्या छंदाला वेळ द्या. आज मी घरी आम्लेट तयार केले. किचन मध्ये अनेक वर्षांनी वेळ दिला, असं म्हणत हा व्हिडिओ शेअर केला होता.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ अजित पवारांचे विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत