नवी दिल्ली : भारतासमोर आधीच आर्थिक संकट गोंगावत असताना कोरोना व्हायरसने धडक दिली. कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाच्या दिशेने जाणाऱ्या भारताला मोठा फटका बसला आहे. अशातच आता रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी देशाला एका गंभीर धोक्याची जाणीव करून दिली आहे.
‘भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाच्या टप्प्यात आहे. सरकारने हे आव्हान पेलण्यासाठी विरोधी पक्षांसोबत तज्ञांची मदत घेतली पाहिजे,” असं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. एकीकडे कोरोनाचं थैमान सुरू असताना आर्थिक आघाडीवरही भारताला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, हे आता स्पष्ट आहे.
देशात करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आव्हानांबद्दल रघुराम राजन यांनी खास ब्लॉग लिहिला असून, त्यात त्यांनी सरकारला पुढील संकटाबद्दल सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राजन यांनी व्यक्त केलेल्या धोक्यानंतर अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकार नेमकी काय पाऊलं उचलणार, हे पाहावं लागेल.

अधिक वाचा  हे काय नवीन! भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघामध्ये खेळणार, जाणून घ्या