करोनाशी दोन हात करताना सगळा देश एकवटला आहे. सगळ्या जगाने भारताच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. केंद्र सरकारने करोनाबाबत कठोर निर्णय घेतले आणि जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. करोनाशी लढा देताना आपण गरीबीशी लढतो आहोत ही बाबही महत्त्वाची आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
करोनाशी दोन हात करताना भारताने केलेल्या प्रयत्नांचे WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कौतुक केलं आहे. करोनाविरोधात आपल्याला मोठी लढाई लढायची आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कालही अवघ्या देशाचं धैर्य पाहण्यास मिळालं. असंख्य दिव्यांनी करोनाचा अंधार दूर केला असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
मोदींनी सांगितलेले पाच संकल्प
१. गरिबांच्या राशनसाठी अविरत सेवा अभियान
२. आपल्यासोबतच घरातल्या इतरांना मास्क द्या
३. धन्यवाद अभियान राबवा
४. आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करायला लावा
५. प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने सहयोगी करावे, ४० लोकांकडून पीएम केअर्स फंडमध्ये दान करण्यास सांगा

अधिक वाचा  जरांगेंचा एकीकडे आंदोलनाच्या तयारीत; दुसरीकडे फडणवीसांनी ओबीसींसाठी हा निर्णय ५ जिल्ह्यांत उत्कृष्ठता केंद्र स्थापन