नवी दिल्ली : देशावर करोनासारखं जीवघेणं संकट घोंघावत असताना सरकारनं पेट्रोल-डिझेलवर गेल्या कित्येक महिन्यांपासून मिळवणारा नफा जनतेसाठी खर्च करायला हवा, असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारनं जनतेला दिलासा देणं गरजेचं असल्याचंही सिंघवी यांनी म्हटलंय.
गेल्या सहा वर्षांत सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे तब्बल २० लाख करोड रुपयांचा फायदा झाल्याचा दावाही अभिषेक मनू सिंघवी यांनी केलाय. सरकारनं नफेखोरी न करता हा पैसा अशा कठिण प्रसंगी आपल्या फायद्यातील एक भाग जनतेसाठी वापरायला हवा, अशी मागणीही सिंघवी यांनी केलीय.
देशात लॉकडाऊन सुरू असताना एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी हा संवाद साधलाय. ‘आज कच्च्या तेलाची किंमत २३ डॉलर प्रति बॅरलवर पोहचलीय. गेल्या सहा वर्षांत किंमतीमध्ये झालेली घसरण आणि उत्पादन शुल्क मिळून हिशोब केला तर सरकारला जवळपास २० लाख करोड रुपयांचा नफा झालाय’ असा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय.
‘आज पेट्रोलची किंमत ७० रुपयांहून अधिक आणि डिझेलची किंमत ६५ रुपयांहून अधिक आहे. ही कोणत्या पद्धतीची करवसुली आहे. इंग्रजांनीही कधी दुष्काळाच्या वेळी अशी करवसुली केली नव्हती’ असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर बोचरी टीका केलीय.
ही वेळ पेट्रोल – डिझेलवर नफा मिळवण्याची नाही तर तर जनतेसोबत नफ्याचे पैसे वाटण्याची आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची ही वेळ आहे, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिलाय. करोना: पुढील २ महिन्यात भारताला कशाची आवश्यकता भासेल?

अधिक वाचा  राज्यात सध्या “लाडकी बहीण योजना” अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही: नितीन गडकरींच्याच विधानाची चर्चा