नवी दिल्लीः देशातील करोना रुग्णांची संख्या वाढून ४०६७ वर पोहोचली आहे. एकूण १०९ जणांचा आतापर्यंत मृत्यू आहे. यातील ३० जणांना गेल्या २४ तासांत मृत्यू झाला असून ६९३ नवे करोना रुग्ण देशात आढळून आले आहेत. तर ४०६७ रुग्णांपैकी तबलीघी जमात मरकझशी संबंधित १४४५ रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
देशातील करोना रुग्णांपैकी ७६ टक्के रुग्ण हे पुरुष आहेत. तर २४ टक्के महिला आहेत. आतापर्यंत १०९ जणांचा झालेला आहे. यापैकी ६३ टक्के मृत्यू हे ६० वर्षांवरील नागरिकांचे, ३० टक्के मृत्यू हे ४० ते ६० वयोगटातील आणि ७ टक्के मृत्यू ४० वर्षांखालील नागरिकांचे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
ज्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक बनत चालली आहे त्यांच्यासाठी Hydroxy chloroquine हे औषध देण्याची परवानगी आम्ही दिली आहे. कारण या औषधा अतिशय मर्यादित प्रभाव दिसून येतो, असं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. तर देशात कुठेही अन्न-धान्याचा तुटवडा होऊ नये म्हणून सरकारने
आतापर्यंत १६.९४ लाख मेट्रिक टन धान्याचा पुरवठा केला आहे. १३ राज्यांना १.३ लाख मेट्रिक टन गहू आणि १.३२ लाख मेट्रिक टन तांदूळ ८ राज्यांना पुरवण्यात आले आहेत. तसंच गेल्या १३ दिवसांत साखरेच्या १३४० वॅगन आणि मीठाच्या ९५८ वॅगनचा पुरवठा देशभरात करण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, देशातील तब्बल २५ हजार तबलीघी जमातच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तसंच तबलीघींनी भेट दिलेल्या हरयाणातील ५ गावांची पूर्णपणे नाकाबंदी केली गेली आहे, अशी महिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.
करोनाच्या चाचणीसाठी सरकारने ५ लाख टेस्टिंग किटची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी अडीच लाख किट हे ८ त ९ एप्रिलदरम्यान मिळतील, अशी माहिती आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.

अधिक वाचा  महापालिका प्रशासनाला सर्वच लोकप्रतिनिधींची निवेदने करोडो निधी तरीही ‘पाणीबाणी’च ; ही कारणे अन् उपाय