भारतीय संघाकडून खेळलेले इरफान आणि युसुफ हे पठाण बंधू सध्या लॉकडाऊनमध्ये पुण्याचे काम करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकांना मास्क वाटले होते. पण आता लोकांची गरज पाहून त्यांनी आता वेगळे दान करायला सुरुवात केली आहे.
सध्या लॉकडाऊनमध्ये ज्यांचे पोट हातावर आहे, जे दिवसाच्या पगारावर काम करतात त्यांच्यावर उपासमारीचा वेळ येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी आता हे पठाण बंधू पुढे सरसावल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्याच्या घडीला गरजू लोकांना अन्न-धान्यांची जास्त गरज आहे. हे पाहता पठाण बंधूने आता अन्नदान करायचे ठरवले आहे. पठाण बंधूंनी १० हजार किलो तांदूळ आणि ७०० किलो बटाट्याचे वाटप केले आहे. बडोदा येथील काही गरजू लोकांना अन्न-धान्याची निकड भासत होती. त्यासाठी आता पठाण बंधू मदतीचा हात देताना दिसत आहेत.
भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग पुढे सरसावला आहे. तब्बल पाच हजार कुटुंबियांना तो अन्न-धान्य पुरवत असल्याचे दिसत आहे. पंजाबमधील जालंधर येथे सध्या बिकट अवस्था आहे. कारण बहुतांशी लोकांना अन्न-धान्याचा पुरवठा झालेला नाही आणि त्यामुळेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. पण या कुटुंबियांसाठी हरभजन हा देवदूत ठरला आहे. जालंधर येथील पाच हजार कुटुंबियांच्या अन्न-धान्याच्या प्रश्न हरभजनने सोडवला आहे.
याबाबत हरभजन म्हणाला की, ” सध्याच्या घडीला काही कुटुंबियापुढे अन्न-धान्याचा प्रश्न बिकट होत चालला होता. या गरजू लोकांना मदत करण्यासाठी मी आणि पत्नी गीता यांनी पुढाकार घेतला आहे. जालंधर येथील पाच हजार लोकांना अन्न-धान्य कसं मिळेल, याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. या पाच हजार कुटुंबियांचा अन्न-धान्याचा प्रश्न आम्ही तुर्तास सोडवला आहे. यापुढेही असे काम करण्याची ताकद मला मिळो, हीच प्रार्थना आहे.”
या परिस्थितीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांची चिंता वाढली आहे. कारण त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी गांगुली आता थेट रस्त्यावर उतरला आहे.
गांगुलीने आता २० हजार गरजू लोकांना जेवण देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार गांगुली आता २० लोकांना जेवण देण्यासाठी पुढे आला आहे. गांगुलीने यावेळी सुरक्षेचे सर्व उपाय केल्याचे पाहायला मिळाले. तोंडाला मास्क आणि हातामध्ये ग्लोव्ज घालून गांगुली लोकांना मदत करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

अधिक वाचा  सोनिया गांधींकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल, रायबरेलीतून लोकसभा प्रियांका गांधी लढवणार?