‘कोरोना विषाणूमुळे 15 एप्रिलपर्यंत भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळं सर्व सेलिब्रिटी आणि खेळाडू आपल्या घरात कैद आहेत. क्रिकेटर हार्दिक पंड्याही आपल्या कुटुंबियांसह मुंबईतील त्याच्या घरी राहत आहे जिथे त्याची मैत्रिणी नताशा स्‍टानकोविचही एकत्र राहत आहेत. नताशाने हार्दिकसोबतचे फोटोही शेअर केले होते. मात्र घरातून बाहेर पडता येत नसल्य़ामुळे नताशाने आपले काही जुने फोटो पुन्हा शेअर केले आहेत.
नताशाने आपला बीचवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये ती बिकिनी घातलेली दिसत आहे. यावर नताशाने काही दिवसांआधी असे कॅप्शन दिले आहे. नताशाने शेअर केलेला फोटो हा व्हिएतनामचा आहे. नताशा आणि हार्दिक यांनी 1 जानेवारी 2020 रोजी साखरपुडा केला. याच वर्षी दोघं लग्न करण्याच्या तयारीत आहे.
27 वर्षीय नताशा बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर असून नताशा मूळचे सर्बियातील आहे. तिचा जन्म सर्बियाच्या पोझर्वेक येथे झाला होता पण आता ती गेली कित्येक वर्ष मुंबईत राहते.

अधिक वाचा  हवाई सुंदरीच्या धर्तीवर एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’