पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवड भागात कोरोनाबाधितांचा आकडा 100 वर पोहोचला (Pune Corona positive patient) आहे. त्यामुळे मुंबईसह पुण्यालाही कोरोनाने विळखा घालायला सुरुवात केली आहे. एकट्या पुणे शहरात 74 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.

कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला (Pune Corona positive patient) आहे. पुणे शहरात सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण हे सहकारनगर, मंगळवार पेठ, नाना पेठ, सिंहगड रोड, कोंढवा या भागात आढळले आहेत.

त्याशिवाय सिंहगड रोडवर वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक या भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे.

अधिक वाचा  राज्यात २८८ मतदारसंघात सर्व्हे, कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची तयारी सुरु?

तसेच रस्ता पेठ, गंज पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ, गुरुवार पेठ, घोरपडी पेठ, शुक्रवार पेठ, पर्वती गाव, सय्यदनगर, हडपसर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, मुंढवा, कोरेगाव पार्क, कोथरूड, मांजरी, नांदेड सिटी, मांगडेवाडी, कात्रज, कर्वेरोड, गुलटेकडी, लक्ष्मीनगर -येरवडा, कल्याणीनगर, बाणेर या ठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. मात्र तरीही पुणेकर सोशल डिस्टंन्सिग किंवा लॉकडाऊनच्या नियमाला हरताळ फासताना दिसत आहे