पुणे – शहरात करोना विषाणूचा कहर वाढत असून गेल्या 24 तासांत तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 5 झाली आहे. दरम्यान, आज शहरात करोनाचे तब्बल 21 रुग्ण सापडले आहेत.

मागील आठ दिवसांपासून शहरात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर दीनानाथ मंगेशकर आणि ससून रुग्णालयात बाधितांच्या मृत्यूमुळे प्रशासन आणि आरोग्य विभागासमोर मोठी चिंता वाढली. गेल्या 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शुक्रवारी (दि.3) ससून रुग्णालयात दाखल 52 वर्षीय व्यक्‍तीचा शनिवारी (दि.4) रात्री मृत्यू झाला. तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

अधिक वाचा  पेपर लीक प्रकरण ‘सर्वोच्च’मध्ये 38 याचिका! तर नीट यूजी परीक्षाच रद्द होणार, न्यायालयाचा सुनावणीत इशारा

तसेच, 60 वर्षीय महिलेला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांची तत्काळ करोनाची तपासणी करण्यात आली असता रविवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यापूर्वी संबंधित महिलेची नायडू रुग्णालयात तपासणी केली असता करोनाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा त्रास होवू लागल्याने त्यांना ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. दरम्यान, औंध येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या 69 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनाही शनिवारीच रुग्णालयात दाखल केले होते. मृत तिघांनाही मधुमेह, उच्च रक्‍तदाब यासह अन्य आजारांची हिस्ट्री होती, अशी माहिती आरोग्य
विभागाने दिली.

अधिक वाचा  पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून हे आवाहन

तीन जणांची प्रकृती चिंताजनक
करोनामुळे आतापर्यंत शहरात 5 जणांचा मृत्यू झाला असून, अजूनही तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामध्ये नायडू रुग्णालय आणि खासगी रुग्णालयातील हे रुग्ण आहेत. तर, राज्यात आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक मुंबई शहरात 22, मुंबई शहराच्या बाहेरील महापालिका हद्दीमध्ये 5, पुणे शहरात 5 तर बुलढाणा, जळगाव आणि अमरावती येथे प्रत्येकी 1 जणांचा समावेश आहे.

Dailyhunt