करोना व्हायरस या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात आढळत आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहे. पण त्याच दरम्यान पुण्यातील शिरुर येथील १० जणांना होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र ते १० जण पळून जाण्याची घटना घडली असून ते सर्व दिल्ली येथील कार्यक्रमाला गेले होते.अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली. त्यावर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, शिरुर येथील १० जणांचा दिल्लीच्या कार्यक्रमाशी काही संबध नसून ते सर्व जण सध्या मध्यप्रदेशात आहेत. तेथील प्रशासना सोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, करोना व्हायरस आजाराच्या पार्श्‍वभूमीवर परदेशातून येणार्‍या नागरिकांची तपासणी केली जाते. त्यामध्ये करोना बाधित आढळल्यास त्यांच्यावर रूग्णालयात उपचार केले जातात किंवा बाधित नसल्यास दक्षता म्हणून होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला जातो. त्यानुसार दिल्ली येथून २३ फेब्रुवारीला पुण्यातील शिरुर येथे आलेल्या दहा जणांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र ते दहाजण ट्रक मधून पळून जाण्याची घटना घडली आहे. या पळून गेलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, ते मध्यप्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली आहे. तेथील प्रशासना सोबत पोलिसांची चर्चा सुरू असून दिल्ली येथील मरकज येथील प्रकरणाशी त्या १० नागरिकांचा काही संबध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  विठूभक्तांना आनंदाची बातमी! मोफत अन् ५०% सवलत आषाढीसाठी ५००० बस; थेट गावातूनच पंढरपूर बससेवा