नागपूर : कोरोना व्हायरसने थैमान घातलं असताना राज्याची उपराजधानी नागपूर एका हत्याकांडानं हादरली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर आलेल्या एका आरोपीने पोलिस काँस्टेबलच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सुशीला मुळे (वय- 52) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सुशीला मुळे यांचे पती अशोक मुळे हे नागपुरात पोलिस विभागात कार्यरत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारन तुरुंगातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आरोपी नवीन गोटागोडे याची देखील पॅरोलवर सुटका झाली होती. आरोपीने शनिवारी सकाळी पोलिस काँस्टेबल अशोक मुळे यांच्या घरात घरात घुसून त्यांची पत्नी सुशीला यांची तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरुन निर्घृण हत्या केली. नागपूरच्या नंदनवन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गाढवे नगरात ही घटना घडली.
पत्नी सुशीला यांची हत्या झाली तेव्हा अशोक मुळे हे ड्युटी वर गेले होते. सुशीला मुळे आणि त्यांचा तरुण मुलगा घरी होते. सकाळी आरोपी नवीन गोटाफोडे हा मुळे यांच्या घरी आला. तुमच्या मुलाचा मित्र असल्याने त्यानं सुशीला मुळे यांनी सांगितलं. मात्र, मुलगा झोपला आहे असे सांगून सध्या भेटता येणार नाही, असं सुशीला यांनी आरोपीला सांगताच त्यानं तीक्ष्ण शस्त्राने गळा कापला. आरोपी नवीन गोटाफोडे हा सराईत गुन्हेगार असून तो 28 मार्चपर्यंत तुरुंगात होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कैद्यांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याची पॅरोलवर सुटका झाली होती. आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी तीन पोलिस पथके रवाना झाली आहेत.

अधिक वाचा  काटोलमधून अनिल देशमुखांपुढे तगडं आव्हान, श्रीकांत जिचकरांचे पुत्र याज्ञवल्क्यने ठोकला शड्डू!