मुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आता अधिक कडक पावले राज्य सरकारकडून उचलण्यास सुरुवात झाली आहे. तसेच दिल्ली येथील धार्मिक तबलिगी कार्यक्रमानंतर कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. राज्यात दिल्लीतील कार्यक्रमाला गेलेल्या लोकांकडून प्रार्दुभाव झाला आहे. त्यामुळ यापुढे खबरदारी घेण्यात येत आहे. संचारबंदी अधिक कडक करण्यात आली आहे. तसेच मुंबईत कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाचा फैलाव हा आता झोपडपट्टीत होऊ लागला आहे. त्यामुळे यापुढे पाच पेक्षा अधिक लोक प्रार्थना, पूजा, नमाजसाठी आले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख दिला आहे. त्यांनी पोलिसांना तशा सूचनाही केल्या आहेत.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे कठोर आदेश देताना म्हणटले आहे, मुंबईत कोणत्याही धर्माची पाच पेक्षा अधिक लोक प्रार्थना, पूजा, नमाज करायला एकत्र आले तर कारवाई करा. आपण तसे मुंबई पोलिसांनी आदेश दिले आहेत. काणर दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमानंतर धारावीतल्या कोरोनाबाधिताच्या मृत्यूचं निजामुद्दीन मरकज कनेक्शन दिसून येत आहे, तशी सूत्रांची माहिती आहे. धारावीतले १० जण ६ दिवस होते. मरकजमध्ये सहभागी झाले होते. धारावीतल्या ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तबलिगी जमातचे सदस्य या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. धारावीत जिथे जिथे हे मरकजचे सदस्य गेले त्याची माहिती काढण्याचं काम सुरु करण्यात आले आहे