हैदराबाद: दिल्लीतील निझामुद्दीनच्या तबलीघी जमातीच्या मरकझमध्ये देशभरातील तब्बल १३,७०२ लोक सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती आंध्र प्रदेश पोलिसांनी दिली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी ही संख्या मोबाइल टॉवरद्वारे प्राप्त केलेल्या विस्तृत विश्लेषणाच्या आधारे काढले आहेत.

ही संख्या स्पष्ट झाल्यानंतर सर्वांचीच चिंता वाढली आहे. याचे कारण म्हणजे या १३,७०२ लोकांच्या संपर्कात किती लोक आले असतील हा प्रश्न आहे. शिवाय या १३,७०२ लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून त्यांना १४ दिवस क्वारंटीनमध्ये ठेवणे हे फार मोठे आव्हान आहे.

या राज्यामध्ये आहेत सर्वाधिक लोक

या १३,७०२ लोकांपैकी ७,९३० लोक हे हाय रिस्कमध्ये आहेत. तर ज्यांना मध्यम स्वरुपाचा धोका आहे अशा लोकांची संख्या आहे ५,७७२ इतकी. जमातींची राज्यवार यादीही तयार करण्यात आली असून या यादीत उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, झारखंड, तेलंगण आणि आंध्र प्रदेश ही राज्ये सर्वात वरच्या स्थानी आहेत. या राज्यांमधील लोकांची संख्या जमातीच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये सर्वात जास्त आहे. याच कारणामुळे या राज्यांमध्ये करोना विषाणूचा संसर्ग अधिक पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण…; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?

अशी उघड झाली माहिती

गुंटूरमध्ये एका लोकप्रतिनिधीच्या मेहुण्याला करोनाची लागण झाल्यानंतर आंध्र प्रदेश पोलिसांनी या संकटाबाबत अॅलर्ट जारी होता. त्यानंतर आंध्र प्रदेश पोलिसांना प्रकाशम जिल्ह्यातील चिराला येथे राहणाऱ्या आणखी एका व्यक्तीबाबत माहिती मिळाली. ही व्यक्ती निझामुद्दीनच्या मरकझमध्ये सहभागी झाली होती. त्या व्यक्तीची तपासणी केली असता त्यालाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

जिल्ह्याधिकाऱ्यांना केले गेले होते सावध

या दोन रुग्णांबाबत माहिती मिळाल्यानंतर निझामुद्दीनच्या मरकझमध्ये जिल्ह्यातील कोण-कोण लोक सहभागी झाले होते, याची माहिती गोळा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकक्षांना देण्यात आली होती. गुप्चतर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय यंत्रणांबरोबरच जमातीत सहभागी होणाऱ्या सर्वच लोकांचे डिजिटल डेटा विश्लेषण आणि मोबाइल टॉवरचे विश्लेषण करण्यात आले.

अधिक वाचा  टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, ब्राझीलला 64-34 ने नमवलं

हे प्रकरण अतिशय गंभीर आणि फार मोठे असू शकते, तसेच यामुळे संपूर्ण देशभर करोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो, असे संकेत तेलंगण आणि जम्मू-काश्मीरमधील काही लोकांच्या मृत्यूनंतर मिळत असल्याचे आयबीच्या एका अधिकाऱ्यानेही स्पष्ट केले होते.