मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरस चीनने तयार केलेलं जैविक हत्यार असल्याचा आरोप काही देशांनी केला आहे. तर काही देश हे अमेरिकेचं षडयंत्र असल्याचा दावा करत आहेत. पण कोरोना व्हायरसविषयी रशियाला आधीपासूनच कल्पना होती का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. सेटेलाईट फोटोंवरून रशियाने आधीपासूनच याची तयारी केल्याचं दिसत आहे.
रशियाने मॉस्कोच्या जवळ ९२ मिलियन पाऊंड खर्च करुन हॉस्पिटल बांधण्याचं काम सुरू केलं होतं. एखाद्या मोठ्या संकटाची चाहूल लागल्यामुळे रशियाने एवढ्या मोठ्याप्रमाणावर हॉस्पिटल बांधण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे.

अधिक वाचा  धनंजय पोवार याने दिली निकी तांबोळीला ‘ही’ मोठी ऑफर, थेट म्हणाला, मी तुला…