करोना व्हायरसचा प्रकोप आपण संपूर्ण जगात पाहत आहोत. दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्याचबरोबर करोनाच्या चाचणीसाठी आता जागाही कमी पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता करोनाच्या चाचणीसाठी स्टेडियम खुला करण्याचा पर्याय अममंलात आणला जात आहे.

करोना व्हायरसचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला एकही क्रीडा स्पर्धा सुरु नाही. त्याचबरोबर क्रिकेटच्या सर्व मालिकाही रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला सर्व मैदानं रीकामी झालेली आहे. मैदानात कोणत्याही प्रकारचा सराव किंवा सामना खेळवला जात नाही. त्यामुळे आता करोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी क्रिकेटचे मैदान उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक वाचा  आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही, शरद पवारांचा पीएम मोदींवर हल्लाबोल

करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या जशी इटली, स्पेन, अमेरिया या देशांमध्ये वाढत आहे, तसेच चिंतेचे वातावरण इंग्लंडमध्येही आहे. इंग्लंडमधील वातावरण आता एवढे वाईट झाले आहे की, त्यांना करोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यासाठी आजा इंग्लंडमधील एजबस्टन हे मैदान करोना व्हायरसच्या चाचणीसाठी खुले करण्यात आले आहे. या मैदानात आता करोना व्हायरसची चाचणी होणार आहे. त्यामुळे काही काळ तरी करोना व्हायरसच्या चाचणीचा प्रश्न इंग्लंडमध्ये तरी संपला आहे, असे म्हटले जात आहे. पण आता हे मैदानही जर कमी पडायला लागले तर काय करायचे यावरही विचार विनिमय सुरु आहे.