मुंबई : ‘कोरोनाचे संकट आणखी गंभीर होत चालले आहे. अशावेळी आपल्या पंतप्रधानांनी मागे टाळ्या वाजवायला लावल्या, आता दिवे लावायला सांगत आहेत. पंतप्रधान असल्यासारखे मोदी वागणार आहे का?,’ असा सवाल राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील जनतेशी सकाळी ९ वाजता संवाद साधला. यावेळी आपण कोरोनाशी एकजुटीची शक्ती दाखवायला हवी असं सांगत रविवारी रात्री ९ वाजता दिवे लावण्याचे संदेश दिले. यानंतर मोदींवर सगळ्याच स्तरावरून टीका होत आहे. जितेंद्र आव्हांडापाठोपाठ आता बाळासाहेब थोरातांनी मोदींवर टीका केली आहे. (एकजुटीने कोरोनाचा अंधार मिटवूया; मोदींचा देशाला संदेश)
‘मोदी देशाचे प्रमुख म्हणून काही निर्णय घेणार आहे का? कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आज गरज आहे ती मेडिकल इक्विपमेंट पुरविणे, जास्तीत जास्त राज्यांना मदत करणे, नागरिकांना धीर देणे, हे सोडून पंतप्रधान दिवे लावायला लावत आहेत, हे पंतप्रधानांचे काम आहे का?’ असा सवाल त्यांनी विचारला आहे. ‘निदान कोरोनाच्या विषयात तरी पंतप्रधानांनी गंभीर व्हायला हवं,’ अशी खंत बाळासाहेब थोरातांनी यावेळी व्यक्त केली.
जितेंद्र आव्हाडांनी देखील याबाबत मोदींवर टीका केली आहे. मोदींनी रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील संपूर्ण दिवे बंद करून मेणबत्या पेटवून कोरोना विरोधात सामूहिक शक्ती दाखवण्याचं आवाहन केलं. मोदींच्या या आवाहनावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड टीका केली आहे. ‘देशाला इतकेही मुर्खात काढू नका.. ‘ असं म्हणत त्यांनी ट्विट केलं आहे.
जितेंद्र आव्हाड एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हा न्यूरोचा पुर्नजन्म म्हणतं.. अंधेरी रात में दिया तेरे हाथ में…. अशी गाण्याची ओळ देखील ट्विट केली आहे. पंतप्रधान मोदींकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही वेगळं बोलण्याची अपेक्षा होती. पण मोदी या संकटाचाही इव्हेंट करू पाहत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी यावेळी म्हटलं आहे.

अधिक वाचा  माझं तिकीट राज्यानं नव्हे देशानं ठरवलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वपक्षियांचा टोला?