मुंबई : करोना विषाणू संक्रमणाची भीती, सामाजिक अंतर आणि लॉकडाऊन या सगळ्यांचा एकूणच मनस्वास्थावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. समाज माध्यमांतून येत असलेल्या माहितीच्या उलटसुलट ओघामुळेही मन अस्थिर झाले आहे. अशा परिस्थितीत मनातील भीती दूर करण्यासाठी परिवर्तन संस्था आणि महाराष्ट्र अंनिस आणि काही समविचारी संस्थाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मनोबल हेल्पलाइन सुरू केली आहे.
वीसहून अधिक समुपदेशक आणि प्रशिक्षित मानस मित्रमैत्रिणी ही हेल्पलाइन सेवा देत आहेत. करोना कशाने संक्रमित होतो, त्याचा प्रतिबंध कसा करावा, हे समजून घेण्याबरोबरच मन मोकळे करण्यासाठी, ही हेल्पलाइन निश्चितपणे मदत करेल, असा विश्वास मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केला.
मराठी आणि हिंदी भाषेतून ही सेवा पुरवली जात आहे. राज्यातील आणि राज्याबाहेरील व्यक्तींसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. तसेच संबंधिताने व्यक्त केलेल्या भावभावनांबाबती माहिती पूर्णपणे गोपनीय राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. समुपदेशकाच्या वेळेनुसार त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणाचीही गरज
आजूबाजूच्या व्यक्तींना भावनिक आधार कसा द्यावा, याविषयीचे चला भावनिक प्राथमोपचार द्यायला शिकूया, हे ऑनलाइन प्रशिक्षण देखील परिवर्तन संस्थेमार्फत आयोजित केले जात आहे. हे प्रशिक्षण घेतलेले लोक स्वतःच्या तसेच इतरांच्या मनातील करोनासंदर्भातील भिती, चिंता घालवण्यासाठी निश्चितपणे मदत करू शकतात. ज्यांना हे प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनीही खालच्या क्रमाकांवर नोंदणी करावी हे प्रशिक्षण पूर्ण मोफत असल्याचे संबधितांनी सांगितले आहे.
हेल्पलाइन संपर्क –
रेश्मा कचरे – ९५६१९११३२०

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळ १००दिवस पूर्ण मंत्रिमंडळाचा one Nation One Election मोठा निर्णय

योगिनी मगर – ९६६५८५०७६९

राजेंद्र पवार – ९४२१९०७९९ संध्या. ४ ते ६

चंद्रकांत भिसे – ७५०७६६०१११ सकाळी ११ ते ६

सुनीता भोसले – ९५५२४५९५५३ पूर्णवेळ

राणी बाबर – ९९२३०९५९०१ पूर्णवेळ

योगिनी मगर – ९६६५८५०७६९ पूर्णवेळ

रुपाली भोसले – ८१४९२७८५०९ पूर्णवेळ

मोरेश्वर देशमुख – ९८६०४१४६०३ पूर्णवेळ

माधुरी आवटे – ९४२०२१६५०५ दुपारी १ ते सहा

श्रृती मधुदीप – ८७८८९७४३६५ दुपारी २ ते ५

नंदिनी जाधव – ९४२२३०५९२९ पूर्णवेळ

कृतार्थ शेवगावकर – ९८२३९७४४०० – पूर्णवेळ

राजू इमानदार – ९८२२९१७५८०

नितीन लेले – ९२८४९१४१७२

अधिक वाचा  कोथरुड जयभवानीनगर बौद्ध विहाराचे सुशोभीकरण!; नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध

रेश्मा कचरे – ९५६१९११३२० पूर्णवेळ

अर्चना बिरदवडे – ९२०९८३४७६२ दुपारी २ ते संध्या. ७

योगेश बागडे – ९७६७३५८८५५ पूर्णवेळ

रश्मी भुवड – ७३५०४०३६७४

साधना बागारे – ९०११०१७७६३

रोहिदास गायकवाड – ८६९८९४१६४२ पूर्णवेळ

सुनीता देशमुख – ७०२०४०२३५२ दु. २ ते ६

प्रभाकर नाईक – ७७१९८३८७४७ पूर्णवेळ

प्रिया कदम – ९९२३८८६७४१

अण्णा कडलासकर – ९२७००२०६२१ पूर्णवेळ