मुंबई : जसलोक रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल झालेल्या मात्र कोणत्याही परदेशी प्रवासाची पार्श्वभूमी नसलेल्या एका रुग्णाची चाचणी ही कोव्हिड १९साठी पॉझिटिव्ह आली आहे. उपचारादरम्यान या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परिचारिकेलाही करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जसलोक रुग्णालयामध्ये या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परिचारिका तसेच इतर वैद्यकीय तज्ज्ञांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
या रुग्णाच्या थेट व अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांचे कोव्हिड १९च्या नियमावलीनुसार विलगीकरण करण्यात आले आहे. रुग्णालयामधील वैद्यकीय कर्मचारी तसेच दाखल असलेल्या सर्व रुग्णांची काळजी घेण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्याचे जसलोक रुग्णालयाने स्पष्ट केले. संबंधित रुग्णाचे अहवाल कोव्हिड १९साठी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या परिचारिकेचा वैद्यकीय अहवाल तपासण्यात आला. तोही कोव्हिडसाठी पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित परिचारिकेला कोव्हिडसाठी विशेष तयार केलेल्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार, पक्षांतर्गत धुसफूस आणि मराठा आरक्षणावरही देवेंद्र फडणवीस कडाडले