करोनाग्रस्तांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारतर्फे केले जात आहेत. अशात महाराष्ट्राची चिंता आणखी वाढली आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ३०२ झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आज कुठे किती रुग्ण पॉझिटिव्ह
अहमदनगर-३
मुंबई- ५९
पुणे-२
ठाणे-२
कल्याण डोंबिवली-२
नवी मुंबई-२
वसई विरार-२
आज सकाळपर्यंत महाराष्ट्रातल्या करनोग्रस्तांची संख्या २३० होती. मात्र आता संध्याकाळपर्यंत ही संख्या ३०२ वर पोहचली आहे. एकट्या मुंबईत एका दिवसात ५९ रुग्ण आढळले आहेत. मुंबईची चिंता वाढलीच आहे पण त्याचसोबत एका दिवसात इतके रुग्ण वाढल्याने महाराष्ट्राचीही चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात आज ७२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी ५९ रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत.
महाराष्ट्रात आणि पंजाबमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देश लॉकडाउन करण्यात आला आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे. तरीही दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. देशात १३०० च्यावर करोनाग्रस्त झाले आहेत. त्यातले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ३०२ इतकी झाली आहे.